तरुण देशोधडीला! शेअर बाजाराच्या शेअरखान कंपनीने ४०० कर्मचाऱ्यांना कमी केलं

मुंबई: नोटबंदी आणि केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारीचा आकडा दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून देशात बेरोजगारी ऐतिहासिक आकडे गाठताना दिसत आहे. ऑटो, बांधकाम, टेक्सटाईल अशा मोठा रोजगार देणाऱ्या उद्योगांना घरघर लागलेली असताना आता त्यात शेअर बाजारातील शेअर खरेदी विक्री संबंधित कंपन्यांना सुद्धा मोठा फटका बसताना दिसत आहे.
देशांतर्गत लघु उद्योग आधीच मोठ्या अडचणीत असल्याने छोटे रोजगार देखील मिळताना दिसत नाही आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ देखील पोषक नसल्याने परिस्थिती अजून कठीण होण्याची भीती तत्ज्ञांनी व्यक्त केली आहे. असं असलं तरी विदेशातील दौर्यात नरेन्द्र मोदी भारतात सर्वकाही ठीक असल्याचे दाखवत आहे. विशेष म्हणजे ज्या शेअर बाजार क्षेत्राला सध्या मंदीचा फटका बसत आहे, त्याच क्षेत्रात कधीकाळी देशाचे गृहमंत्री व्यावसायिक होते. कारण शेअर बाजाराचा शहेनशहा म्हणून परिचित असणारी ब्रोकिंग कंपनी शेरखान अडचणीत आली असून जवळपास ४०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शेअरखान ही बीएनपी परिबासची ब्रोकिंग फर्म आहे. ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे ही कंपनी गुंतवत असते. ऑनलाईनद्वारे ही कंपनी गुंतवणूकदारांना मार्गदर्शनही करत असते. ही कंपनी ऑनलाईन ब्रोकिंग मॉडेल आणि महसूल कमी झाल्याने कर्मचारी कपात करत असल्याचे कंपनीने सांगितले.
त्यामुळे जवळपास ४०० जणांना नोकरी सोडण्यास सांगण्यात आले आहे, आणखी काही जणांना पुढील काही आठवड्यांत कंपनी सोडण्यास सांगण्यात येणार असल्याचे कंपनीतील सूत्रांनी सांगितले. यातील अनेक कर्मचारी हे विक्री आणि मदतनिस म्हणून काम करतात. इकॉनॉमिक्स टाईम्सने हे वृत्त दिले आहे. कंपनीला पाठविलेल्या मेलला कंपनीने उत्तर दिले आहे. यामध्ये ३५० कर्मचाऱ्यांना कंपनी सोडण्यासा सांगितल्याचे म्हटले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं