अपमानाने संतप्त! गणेश नाईकांनी पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली

नवी मुंबई: शहरातील राजकारणावर पकड असलेल्या गणेश नाईक यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी डावलली आहे. बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी इच्छा नाईक यांनी पक्षश्रेंष्ठीकडे व्यक्त केली होती. मात्र भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा मंदा म्हात्रे यांनाच संधी दिली. त्यामुळे नाईक यांचे कार्यकर्ते नाराज झाले असून नवी मुंबईचे महापौर आणि नगरसेवकांची नाईक यांनी बैठक बोलावली असल्याचे समजते. या बैठकीनंतर नाईक आपली पुढील रणनीती ठरवणार आहेत. काल भारतीय जनता पक्षाने १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसहीत नाईक यांना देखील डावलण्यात आले होते.
बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघावर नाईक कुटुंबाने दावा केला होता. परंतू भारतीय जनता पक्षाने काल जाहीर केलेल्या १२५ जणांच्या पहिल्या यादीत ऐरोली मतदारसंघतून नाईक यांच्या मुलाला संधी देण्यात आली. तर नाईक यांना बेलापूर मतदारसंघातून डावलण्यात आले. याजागी विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनाच उमेदवारी देण्यात आल्याने समाज माध्यमांवर प्रतिक्रियांचा पूर आला होता.
यामुळे गणेश नाईक नाराज झाले असून त्यांनी आज सकाळी महापौर बंगल्यावर नरसेवकांची तातडीची बैठक बोलावली आहे. १२:३० वाजता महापौर बंगल्यावर ही बैठक होणार आहे. भारतीय जनता पक्ष, एनसीपी आणि अपक्ष अशा ५६ नगरसेवकांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. या बैठकीला संदीप आणि संजीव नाईक उपस्थित राहणार आहेत.
गणेश नाईक यांनी ११ सप्टेंबर रोजी पालिकेतील ५२ नगरसेवकांसह जोरदार शक्तिप्रदर्शन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे बेलापूर मतदारसंघातून त्यांनाच उमेदवारी मिळेल, असे मानले जात होते. दरम्यान, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांनी नाईक यांच्याबाबत योग्य विचार केला असून योग्य वेळ आल्यावर ते चर्चा करतील असे सांगितले होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं