माहीम: मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आज शक्तिप्रदर्शन करत माहिम विधासभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. याच मतदारसंघाची ओळख असलेल्या सिद्धीविनायक मंदिरापासून भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आणि या रॅलीला मनसे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माहीम विधानसभा शिवसेना आणि मनसेसाठी प्रतिष्ठेची आहे कारण याच मतदारसंघात सेनाभवन आणि राजगड देखील आहे. तसेच नेहमीच वर्दळ असणारं राज ठाकरे यांचं कृष्णकुंज हे निवासस्थान देखील याच मतदारसंघात आहे.
संदीप देशपांडे यांची थेट लढत शिवसेना उमेदवार सदा सरवणकर यांच्याबरोबर होणार आहे. सदा सरवणकर हे विद्यमान शिवसेना आमदार आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संदीप देशपांडे यांनी सदा सरवणकरांचा यावेळी पराभव करु असा विश्वास व्यक्त केला. मागील ५ वर्षात दादरचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. अनेक स्थानिक प्रश्न प्रलंबित आहेत. पार्किंगची सर्वात मोठी समस्या स्थानिकांना भेडसावत आहे. तसेच अनेक बिल्डर काम अर्धवट सोडून निघून गेले आहेत. त्यामुळे आपल्या मतदाराने मनसेला संधी दिल्यास हे सर्व प्रश्न मार्गी लावू असा संदीप देशपांडे यांनी विश्वास व्यक्त केला.
यावेळी संदीप देशपांडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी माजी आमदार नितीन सरदेसाई आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे देखील उपस्थित होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर यांनी निसटत्या फरकाने नितीन सरदेसाई यांचा पराभव केला होता. त्याआधी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत नितीन सरदेसाई यांनी सदा सरवणकरांचा पराभव केला होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं