उद्या पुण्यात राजगर्जना; नक्की काय बोलणार यावरून सत्ताधाऱ्यांची चिंता वाढली

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली सभा पुण्यात कुठल्याही परिस्थितीत होणारच, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. पुण्यातील नातूबागेच्या जवळील सरस्वती शाळेच्या मैदानात राज ठाकरे यांच्या सभेची तयारी मनसैनिकांनी सुरू केली आहे. या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता राज ठाकरे पुण्यातील मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाषण करतील.
राज ठाकरे यांच्या सभेसाठी अनेक ठिकाणी परवानगी मागितली, मात्र पोलीस आणि प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. कितीही गुन्हे दाखल झाले तरी राज ठाकरेंची सभा नातूबागेच्या जवळील मैदानात होणार असल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं. कसबा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अजय शिंदे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा पुण्यात होत आहे.
विधानसभेच्या निवडणुकीचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराचा नारळ येत्या ९ तारखेला पुण्यात वाढवला जाणार आहे. राजसाहेबांची जंगी सभा संध्याकाळी ६ वाजता नातूबाग येथील सरस्वती मंदिर संस्थेच्या मैदानात होणार आहे. तेंव्हा मोठ्या संख्येने जमूया pic.twitter.com/DoueNHnURp
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) October 7, 2019
मनसेने कोथरुडमधून चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात उमेदवार मैदानात किशोर शिंदे यांना उतरवले आहे. कोथरूडमध्ये मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पाठिेंबा जाहीर केला आहे. चंद्रकांत पाटलांना घेरण्यासाठी आघाडीनं व्यूहरचना केल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची वाट खडतर होणार आहे. अशातच राज यांची सभा पुण्यात होणार असल्याचे त्याचा पक्षाच्या उमेदावारांना फायदा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकींच्या वेळी प्रत्यक्ष निवडणुकींमध्ये न लढता राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात प्रचार केला होता. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये त्यांनी डिजीटल माध्यमांची आणि प्रेझंटेशनची मदत घेत सभा घेऊन सरकारच्या दाव्यांची पोलखोल केली होती. त्यामुळे यंदा विधानसभेला मनसे फॅक्टर निवडणुकीमध्ये काय कमाल करणार याबद्दल राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं