सेना-भाजपाला तब्बल ३० जागांवर बंडखोरांचा फटका बसण्याची शक्यता

मुंबई: राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी मैदानात उतरलेल्या शिवसेना-भारतीय जनता पक्ष महायुतीची बंडखोरांमुळे डोकेदुखी वाढली आहे. राज्यातील एकूण ३० विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या इच्छुकांनी बंडखोरी केल्याने या तीसही जागांवर महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत बंड शमवण्यात महायुतीला यश आले नाही. काही नेत्यांनी आपली तलवार म्यान केली. मात्र, काही नेत्यांनी बंडाचा झेंडा उचलला. या बंडखोरीमुळे शिवसेना-भारतीय जनता पक्षाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.
यंदाच्या विधनसभा निवडणुकीत ५० मतदारसंघात तब्बल १४४ सर्वपक्षीय बंडखोरांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. या बंडखोरीचा फटका शिवसेना-भाजपाला बसण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये स्वंतत्र लढलेल्या सेना-भारतीय जनता पक्षाने युती केल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला. शिवाय आयात उमेदारांना तिकिट मिळाल्यामुळेही पक्षातील नाराजी समोर आली. यामुळे काही इच्छुक नेत्यांनी बंडाचं निशाण फडकावत उमेदवारी अर्ज भरले. अर्ज माघे घेण्याच्या दिवशी काहींची नाराजी दूर करण्यात महाआघाडीला यश आले. मात्र, जवळपास ३० जागांवर बंडखोरांचं मन वळविण्यात दोन्ही पक्षाला यश आलेलं नाही. त्यामुळे राज्यातील ३० जागांवर आघाडीला फायदा आणि युतीला फटका बसण्याची शक्यता आहे.
नाशिक पूर्व मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी नाकारल्याने एनसीपीने त्यांना उमेदवारी दिली. त्यांच्या समर्थनार्थ मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक यांनी माघार घेतली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे राहुल ढिकले यांच्या विरोधात सानप अशी लढत रंगणार आहे. पश्चिम मतदारसंघात भारतीय जनता पक्ष उमेदवाराच्या विरोधात सेना नगरसेवकाने अपक्ष उमेदवारी जाहीर केल्याने यंदाही येथे बंडाची परंपरा जोपासली आहे. कळवण सुरगाणा मतदारसंघात माकपतर्फे आतापर्यंत सहा वेळा आमदारकी भुषविलेले जे. पी. गावित पुन्हा रिंगणात असून, त्यांचा सामना एनसीपीचे दिवंग नेते ए. टी. पवार यांचे पुत्र नितीन पवार यांच्याशी होत आहे. ए.टी. यांच्या स्नुषा डॉ. भारती पवार भारतीय जनता पक्षाच्या खासदार आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं