'हीच ती वेळ, नवा महाराष्ट्र घडवायची’, मग ५ वर्ष झोपले होते काय? राज ठाकरे

मुंबई: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवावी, अशी इच्छा शिवसेना आमदार अनिल परब यांनी बोलून दाखवल्यानंतर युवासेनेला स्फुरण चढलं होतं. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी पोस्टरबाजी करण्यात आली होती. संपूर्ण वरळी परिसरात आदित्य ठाकरे यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. ‘हीच ती वेळ आहे , नवा महाराष्ट्र घडवायची’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. मागील ५ वर्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेली शिवसेना सत्ताकाळ विसरून पुन्हा ‘हीच ती वेळ, नवा महाराष्ट्र घडवायची’ अशी बॅनरबाजी करू लागल्याने त्यांची खिल्ली उडविण्यात येत आहे.
हीच ती वेळ म्हणता तर गेली पाच वर्षे काय करत होता? हीच ती वेळ म्हणण्याचा अधिकार मला आहे. कारण सरकार तो अधिकार गमावून बसले आहे. नोकऱ्या मिळतील, बँकांची कामं सुरळीत होतील, पण त्यासाठी सरकारवर अंकुश हवा. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना मत द्या, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. ‘मी कोणतंही आंदोलन अर्धवट सोडलेलं नाही. रेल्वे भरतीसाठी आंदोलन केलं, रेल्वे स्थानकांबाहेरील फेरीवाले हटवले, पोलिसांसाठी रस्त्यावर उतरलो, मराठी सिनेमे, मराठी माणसांसाठी आंदोलने केली. मनसेने ही आंदोलनं केली,’ असं राज म्हणाले. मागाठणे येथील सभेत ते बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज प्रचाराच्या अखेरच्या रविवारीही मुंबईत प्रचाराचा सपाटा लावला.
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी आरे वृक्षतोडीवरून शिवसेनेला टोला लगावला आहे. त्यांनी सरकारने एका रात्रीतून आरेतील २७०० झाडं तोडली. मात्र, त्यानंतर आलेल्या शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आरेवर एक शब्दही नाही. उद्धव ठाकरे आता निवडणुकीत निवडून आलो, तर आरेला जंगल घोषित करण्याचं आश्वासन देतात. पण निवडून आल्यावर ते गवत लावून जंगल घोषित करणार आहे का? अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर टीका केली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं