उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी शाळेची भिंत तोडली; सहामाही परीक्षा पुढे ढकलली

उस्मानाबाद: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबादमधील प्रचार सभेसाठी जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत दोन ठिकाणी तोडण्यात आली आहे. विशेष म्हणजे शाळेच्या प्रांगणात सभेची परवानगी देताना इमारतीची काळजी घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. मात्र शिवसेना नेत्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. दरम्यान, आजच्या सभेमुळे शाळेतल्या परीक्षेचं वेळापत्रकही बदलण्यात आलं आहे.
शिवसेना पक्षाचा हा असंवेदनशीलपणा स्थानिकांना पटलेला नसून, विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील खेद व्यक्त केल्याचे वृत्त आहे. मुलांनी वेळेचं नियोजन करून अभ्यास केलेला असतो, मात्र शिवसेनेला स्वतःच्या सभेचं आयोजण न करता आल्याने त्याचा फटका थेट शाळेला बसला असून जिल्हा परिषदेला आर्थिक नुकसान देखील झालं आहे.
आदित्य ठाकरे यांनी शिव आशीवार्द यात्रेत विद्यार्थ्यांशी संवाद साधत जो संदेश दिला होता, त्याच्या अगदी उलट शिवसैनिक वागत असल्याचं यावरून स्पष्ट होतं आहे. एकूणच निवडणुकांसाठी विद्यार्थी आणि शाळांना देखील वेठीस धरलं जात असल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे आणि संबंधित कार्यकर्त्यांवर पक्ष नेमकी कोणती कारवाई करणार ते पाहावं लागणार आहे.
सध्या या शाळेत सहामाही परीक्षा सुरु आहे. आज पाचवी ते आठवी इयत्तेची चाचणी परीक्षा आहे. तर नववी आणि दहावीचा, गणित, विज्ञान आणि हिंदी विषयाचे पेपर आहेत. प्रशासनाने दबावापोटी परीक्षेचं वेळापत्रक बदलण्यास भाग पाडलं, तरीही परीक्षेची वेळ आणि सभेची वेळही एकच आहे. मात्र शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी पैसे वाचवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेचं आयोजन केलं आहे. परीक्षा हॉल आणि उद्धव ठाकरेंचं सभास्थळ यात अवघं दहा फुटांचं अंतर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे उद्धव ठाकरे स्थानिक कार्यकर्त्यांना दम देतील का आणि विद्यार्थीहित लक्षात घेऊन या ठिकाणची सभा रद्द करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं