तरुणांमध्ये बँकिंग क्षेत्र आणि सरकारी नोकरीप्रति अधिक आकर्षण: ओलिवबोर्डच सर्वेक्षण

बंगळुरु: देशात उच्चशिक्षित तरुणांच प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना तरुणांचा नोकरीकडे पाहण्याचा दृष्टिकोण अजूनही पारंपरिक असल्याच सर्वेक्षणात समोर आलं आहे. देशात आजच्या घडीला खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या मोठ्या प्रमाणावर घटत आहेत. त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे भविष्यात शंभर मनुष्यबळाची कामं मोठ्या प्रमाणावर एक मशीन करणार आहे. त्यामुळे असलेला रोजगार देखील घटणार यात शंका नाही.
त्यात देशात आलेल्या मंदीमुळे अनेक खाजगी क्षेत्रातील शास्वत रोजगार देखील करोडो लोकांनी गमावल्याने अनेकांना सुरक्षित रोजगार हवा असल्याचं समोर आलं आहे. अगदी वेतन कमी असलं तरी मिळालेला रोजगार किंवा नोकरी सुरक्षित असावा याकडे तरुणांचा कल वाढताना दिसत आहे आणि हे सोमवारी एका अहवालातून समोर आली आहे. सुरक्षित नोकरीनंतर, तरुण दुसऱ्या क्रमांकावर जीवनात आणि कामात संतुलन राखण्याला अधिक महत्त्व देत असल्याचे दिसून आले. त्यामुळे भारतीय तरुणांमध्ये बँकिंग क्षेत्र आणि सरकारी नोकरीप्रति अधिक आकर्षण असल्याचे दिसते.
या सर्वेक्षणात देशभरातील बँकिंग आणि सरकारी नोकरीसाठी तयारी करीत असलेल्या ५,००० तरुणांच्या प्रतिक्रियांचा आढावा घेण्यात आला. ‘ओलिवबोर्ड’च्या सर्वेक्षणात आढळून आले की, ४४.३% तरुणांनी नोकरीच्या स्थिरतेसाठी मत दिले. तर ३६.७ टक्के तरुणांनी काम आणि जीवनातील योग्य संतुलन याची निवड केली. मात्र चांगल्या वेतनासाठी केवळ ११.१ टक्के तरुणांनी पसंती दिली आहे.
‘ऑलिव्हबोर्ड’चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक पाटील यांनी सांगितले की, जेव्हा आपण भारतीय तरूणांच्या आकांक्षांबद्दल बोलतो तेव्हा मोठी शहरे, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि स्टार्टअपच्या पलीकडे पाहणे महत्वाचे आहे. अधिकतर भारतीय लहान शहरं आणि खेड्यांमध्ये राहतात, जिथे सरकारी क्षेत्रातील नोकरीची मागणी सर्वात अधिक आहे. आमचा सर्व्हे समाजातील या दुर्लक्षित वर्गातील तरुणांची स्वप्नं आणि त्यांच्या प्रेरणांवर प्रकाश टाकत असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे यावरून तरुणांमधील नोकरीकडे बघण्याचा दृष्टिकोन समोर आला आहे आणि त्यात सरकारी नोकरी अधिक महत्वाची वाटू लागली आहे, जी अधिक सुरक्षेची हमी देते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं