ब्रेकिंगन्यूज: सुन्नी वक्फ बोर्डाने आयोध्या वादग्रस्त जमिनीवरील दावा सोडला

नवी दिल्ली : सुप्रिम कोर्टात सुरु असलेल्या अयोध्या येथील राम मंदिर प्रकरणी आज सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीचा ३९वा दिवस होता. यावेळी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी बुधवारी म्हणजे आज या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होण्याचे संकेत दिले. यावेळी सर्व पक्षकारांना आज बुधवारी आपला युक्तीवाद पूर्ण करण्याचे आदेश काल देण्यात आले. विशेष म्हणजे, या पार्श्वभूमिवर अयोध्येमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले होते.
यावर हिंदू महासभेचे वकील विष्णू जैन यांनी आज सर्व पक्षकार आपला युक्तीवाद पूर्ण करतील अशी आशा व्यक्त केली आहे. या युक्तीवादानंतर मोल्डिंग ऑफ रिलीफवर चर्चा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आज बुधवारी या प्रकरणावर चर्चा पूर्ण झाल्यास निकाल सुरक्षित ठेवला जाईल. पण या सर्व गोष्टी न्यायालयावर अवलंबून आहेत. असेही ते यावेळी म्हणाले.
मात्र आता आयोध्येतल्या राममंदिर खटल्याबाबत सर्वात मोठी बातमी आहे. या खटल्यात नाट्यमय घडामोड घडली आहे. या खटल्यातले पक्षकार असलेल्या सुन्नी वक्फ बोर्डाने या वादग्रस्त जमिनिवरील दावा सोडला आहे. त्यामुळे सुन्नी वक्फ बोर्ड याप्रकरणी आपली याचिका मागे घेणार आहे. याबाबत मध्यस्थ समितीला प्रतिज्ञापत्र पाठवला आहे. मध्यस्थ समितीच्या तीन जणांपैकी एक असलेल्या श्रीराम पंचू यांना सुन्नी वक्फ बोर्डानं हे प्रतिज्ञापत्र पाठवलंय. राम जन्मभूमी खटल्याच्या युक्तिवादाचा आज अखेरचा दिवस आहे. त्यामुळे अखरेच्या टप्प्यात या खटल्याला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे.
सुन्नी वक्फ बोर्डाने अयोध्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. लवादाच्या अध्यक्षांनी लवाद समितीचे सदस्य श्रीराम पंचू यांना हे प्रकरण मागे घेण्याचे प्रतिज्ञापत्र पाठविले. दरम्यान, अयोध्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू झाली आहे. मात्र, सुन्नी वक्फ बोर्डाचे अपील मागे घेण्याबाबत कोर्टात चर्चा झालेली नाही. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा वाद पूर्ण होईल, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केले. सरन्यायाधीशांनी निर्णय घेतलेल्या पक्षांव्यतिरिक्त कोणाचाही हस्तक्षेप करण्यास परवानगी नाकारली. हिंदू बाजूचे वकील सीएस वैद्यनाथन यांनी चर्चेला सुरुवात केली.
बाबरी मशीद बेकायदेशीरपणे उद्ध्वस्त केली असली, तरी त्यामुळे त्या जागेवरील मुस्लिमांचा हक्क संपुष्टात येत नाही. पुरातत्व विभागाच्या उत्खननात तिथे पूर्वी भव्य वास्तू असल्याचे संकेत देणारे भग्नावशेष मिळाले, म्हणून मशिदीची जागा हिंदूंची होऊ शकत नाही. इतिहासात मागे जाऊन शासकांच्या कृतींची योग्यायोग्यता न्यायालये तपासू लागली, तर याला अंतच राहणार नाही. स्वातंत्र्य व गणराज्य स्थापनेनंतर भारत उदयास आल्याने अशा वादांना १९४७ ते १९५० पर्यंतच मागे जाण्याची मर्यादा घालावी लागेल, असा युक्तिवाद सुन्नी वक्फ बोर्डाच्या वतीने ज्येष्ठ वकील डॉ. अनिल धवन यांनी केला होता.
त्यावर महंत मोहन दास यांच्यातर्फे पराशरन यांनी बाबराने केलेली चूक सुधारण्याचा मुद्दा मांडला. बाबराने आक्रमण करून हिंदुस्थान जिंकला. तो शासक झाला, तरी त्याची लहर व मर्जी हाच त्याचा कायदा होता. त्यातूनच श्रीराम जन्मभूमीवर त्याने मशीद बांधली, असे ते म्हणाले. एकदा मशीद म्हणून वापरली गेलेली वास्तू कायम मशीदच राहते, असे मुस्लीम पक्षकारांचे म्हणणे आहे. बाबरी मशीद पाडली, तरी त्याने त्या जागेवरील आमचा हक्क संपत नाही. यावर तुमचे काय म्हणणे आहे, असे न्यायमूर्तींनी पराशरन यांना विचारले असता, पराशरन म्हणाले की, या म्हणण्यात काही अर्थ नाही. अन्य धर्मीयांच्या श्रद्धास्थानी मशीद उभारू नये, असे इस्लाम सांगतो. एकदा असलेले मंदिर हे कायमसाठी मंदिरच असते, असे आम्हीही म्हणतो, तेही मान्य करावे लागेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं