रविकांत तुपकर यांची घरवापसी; पुन्हा येणार स्वाभिमान पक्षात

पुणे: काही दिवसांपूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची साथ सोडलेले राजू शेट्टी यांचे खंदे समर्थक रविकांत तुपकर पुन्हा घरवापसी करणार आहेत. आज, सायंकाळी ते स्वाभिमान पक्षात पुन्हा प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी तुपकर यांनी स्वाभिमानीला सोडचिठ्ठी देऊन सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांतीमध्ये प्रवेश केला होता. मात्र काही दिवसांमध्येच ते पुन्हा आपल्या मुळ घरी परतणार असल्याने राजू शेट्टींना दिलासा मिळाला आहे.
तुपकर हे स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष होते. राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ते पुन्हा स्वाभिमानीत प्रवेश करतील, अशी माहितीही समोर येत आहे. अंतर्गत राजकारणामुळे तुपकर यांनी राजू शेट्टींची साथ सोडली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसला होता. २६ सप्टेबरला स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. रविकांत तुपकर हे पक्षाचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचे खंदे समर्थक मानले जात होते.
तत्पूर्वी रवीकांत तुपकर यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा तसेच सदस्यत्वाचा राजीनामा राजू शेट्टी यांना पाठवला होता. ‘मी गेल्या अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो. माझ्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. पण आज प्रदेशाध्यक्षपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, तो मंजूर करावा’ असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांतीमध्ये प्रवेश केला होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं