१३ वर्ष मंत्रीपद दिल्यानंतर काम करता येणार नसेल तर बांगड्या भरा: शरद पवार

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्यानं आरोप-प्रत्यारोपांना धार चढली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सर्वाधिक आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांवर हल्ले चढवत आहेत. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर तोफ डागताना पवार यांनी आज त्यांना बांगड्या भरण्याचा सल्ला दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पवार यांनी आज श्रीगोंद्यात जाहीर सभा घेतली. त्यावेळी पवार यांनी पाचपुते यांना लक्ष्य केलं. ‘पाचपुते यांना मी रयत शिक्षण संस्थेत सदस्य केले. पण, पाचपुते रयत शिक्षण संस्थेत बसून राजकारण करायला लागले होते. पाचपुते हे बिनकामाचे मंत्री होते. राष्ट्रवादीने त्यांना वनमंत्री, आदिवासी मंत्री केले. १३ वर्षं मंत्रिपद दिले. इतकी वर्षे मंत्रिपद मिळूनही त्यांना काही करता आले नसेल तर त्यांनी बांगड्या घातल्या पाहिजेत,’ अशी जहरी टीका पवार यांनी केली. पाचपुतेंनी खासगी कारखाने काढून शेतकऱ्यांचे पैसे थकविले.
यांना गृह खात्याचा राज्यमंत्री केलं. जाईल तिथे पोलिसांचा सॅल्युट मिळायचा. मंत्रिमंडळात वन खातं हे महत्वाचं खातं असतं. मी स्वतः वनमंत्री होतो. मुख्यमंत्री असताना गृह खाते कमी करुन वनखातं घेतलं. महाराष्ट्रात वनसंपत्ती वाढवल्याशिवाय पावसाचा, पाण्याचा आणि बाकीचा जो प्रश्न आहे तो सुटणार नाही. म्हणून मी स्वतः ते काम केले आहे असेही पवार म्हणाले.
कारखाने कितीही काढा परंतु इथल्या कामगाराचे पैसे आणि शेतकर्यांचं देणं द्या. ज्यांनी कष्टकरी शेतकऱ्यांनी आपला ऊस घालून वर्ष दोन वर्ष पैसे थकवले तर ती गोष्ट योग्य नाही. त्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची मेहनत करुन घाम गाळलेली पगाराची रक्कम त्याला मिळत नसेल. तर त्याची चुलही पेटत नाही. जो माणूस कष्ट करणार्या कामगाराची चुल न पेटवण्याचे काम जो माणूस करतो त्याला गरिबांचा तळतळाट लागतो आणि हा तळतळाट असला की त्याला यश घेता येत नाही अशी टीकाही पवार यांनी केली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं