शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी पवारांचं मुख्यमंत्र्यांना प्रतिउत्तर

पुणे: “पात्रता नसताना राज्य सहकारी बँकेनं काही लोकांना कर्ज दिलं. बँकेने वेगवेगळ्या प्रकारचे ठराव केले. पैसा चुकीच्या पद्धतीनं वाटला, संपत्ती विकली, कोणालाही कर्ज दिलं अशा काही ठरावांमध्ये शरद पवार यांच्या निर्देशानुसार हे करण्यात आल्याची नोंद केली आहे. याव्यतिरिक्त काही पत्रदेखील आहेत. ज्यामध्ये शरद पवार यांनी काही व्यक्तींना कर्ज देण्याची विनंती केली आहे. त्यामुळं अशा पत्राची आणि कर्जाची चौकशी करण्यात येत आहे. याचा तपास ईडीकडून सुरु आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जिल्हा बँकांना आर्थिक सहाय्य करण्याची जबाबदारी नाबार्डची आहे. अडचणीत आलेल्या बँकांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी नाबार्डनं काही गाईडलाईन्स दिल्या आहेत. राज्य सहकारी बँकेनं याच गाईडलाईन्सच्या आधारावर काही संस्थांना मदत करण्याचा निर्णय घेतला. पण मी बँकेचा संचालक नाही. त्यामुळे मी बँकेच्या निर्णयप्रक्रियेशी संबंधित नाही. तर ज्या संस्थांना पैसे दिले त्यांच्याशी माझा संबंध नसल्याचंही शरद पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, म्हशीला रेडवू झालं आणि जन्मताच ते म्हशी पेक्षा मोठं झालं अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सहकारी बँक गैरव्यहारप्रकरणी भाष्य केले आहे. शिरुर हवेली विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारात ते बोलत होते.
आम्ही कधी सत्तेचा माज आणि मस्ती केली नाही. राज्य सहकारी बँकेत साडेअकरा हजार कोटींच्या ठेवी असताना पंचवीस हजार कोटींचा घोटाळा होईलच कसा ? हे म्हणजे असं झालं म्हशीला रेडवू झालं आणि जन्मताच ते म्हशी पेक्षा मोठं झालं अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारला लक्ष्य केलं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं