खणा-नारळाची ओटी भरून आता लेकीची सासरी पाठवणी करा: रुपाली चाकणकर

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून देखील विजयी होण्याचे दाखले देण्यात येत आहेत. भारतीय जनता पक्षाने केलेल्या सर्वेक्षणानुसार भाजपच्या जवळपास ४० जागांवर विरोधकांशी तगडा सामना होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे जवळपास ६ मंत्री सध्या पराभवाच्या छायेत असल्याचं म्हटलं जातं आहे.
मराठवाड्यातील परळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सर्वांचं लक्ष वेधत असल्याने या जागेवर दुसऱ्यांदा इतिहास लिहिला जाणार असल्याचं राजकीय तज्ज्ञांना वाटत आहे. स्वतः राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे मैदानात उतरले असून त्यांचं देखील या मतदारसंघात कार्यकर्त्यांचं मोठं जाळं असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे विद्यमान मंत्री पंकजा मुंडे यांना तगडं आवाहन निर्माण झालं आहे. दोन्ही बाजूने आर्थिक आणि सहकार क्षेत्रातील शक्ती पणाला लागली असून, जोरदार प्रचार सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असताना राष्ट्रवादी पक्षातील महिला आघाडी देखील धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरली आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील परळीच्या रणांगणात उडी घेतली आहे.
त्या अनुषंगाने रुपाली चाकणकर यांनी फेसबुकवरून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. खणा-नारळाची ओटी भरून आता लेकीची सासरी पाठवणी करा. चार दिवस सणासुदीला माहेरपणाला येऊन गोडधोड खा, माहेरच्या लोकांना आशिर्वाद द्या आणि आता सुखाने सासरी नांदा, आणि माहेरच्यांना पण सुखाने राहु देत हिच या दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा..! अशी टीका चाकणकर यांनी केली.
तसेच शक्य झालं तर सासरचं नाव लावा असा सल्ला चाकणकर यांनी पंकजा मुंडे यांना नाव न घेता दिला. लोकसभेला एका लेकीला मतदान केले आहे. विधानसभेचं मतदान लेकासाठी करा, असं आवाहनही चाकणकर यांनी केले. आता या टीकेला पंकजा काय उत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं