राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे, भाजपला सुद्धा कळून चुकले आहे: शरद पवार

मुंबई: विधानसभा निवडणुकीत यावेळी महाराष्ट्रात चमत्कार घडेल, जनतेचा मूड वेगळा आहे. त्यामुळे राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाला कळून चुकले आहे, हे राज्य आपल्या हातातून जाणार आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री इथे येऊन सभा घेतात. आपले मुख्यमंत्री प्रत्येक मतदारसंघात जात आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आले, इतर केंद्रीय मंत्री आलेत ते इथे पर्यटनासाठी फिरतायत का? यांना खात्री झाली आहे. हे राज्य आपल्या हातातून जाईल की काय, लोकांचा मूड आपल्याविरोधात आहे, हे त्यांच्या लक्षात आले आहे, असे प्रवार म्हणालेत.
एका खाजगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं. माझे राज्य आहे, त्यामुळे पाया अधिक मजबूत करण्यासाठी मी अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडाची प्रचारात चांगले काम करत आहेत. काँग्रेसचे नेते ताकदीने लढत आहेत. मात्र, – सत्तेचा गैरवापर कसा करावा, विरोधकांविरुद्ध सूडाचे राजकारण कसे करावे हे आजच्या राज्यकर्त्यांनी दाखवले आहे, अशी टीका पवार यांनी यावेळी भाजप आणि शिवसेना सरकारवर केली.
दरम्यान, एनसीपीला ग्रामीण महाराष्ट्रातून मोठा पाठिंबा मिळत असून कालच्या साताऱ्यातील पवारांच्या स्फूर्ती देणाऱ्या भाषणामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी चांगलेच जोशमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पावसात केलेली तुफान फटकेबाजी सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या वयातही शरद पवार यांनी दाखवलेल्या जिद्दीचं सर्वसामान्यांकडून कौतुक होत आहे. पाऊस सुरु असतानाही शरद पवार यांनी सभा न थांबवता उपस्थित कार्यकर्ते आणि समर्थकांना संबोधित केलं. विशेष म्हणजे व्यासपीठावर येताना शरद पवार यांच्या डोक्यावर छत्री धरलेली होती. पण शरद पवार यांनी ही छत्री दूर केली.
झालं असं की, शरद पवारांच्या सभेसाठी मैदानात कार्यकर्ते आणि समर्थकांनी चांगलीच गर्दी केली होती. पवारांचं भाषण सुरु होण्याच्या आधीपासून पावसाची संततधार सुरु होती. पण पावसातही कार्यकर्ते मैदानात थांबून होते. शरद पवार व्यासपीठावर आले तेव्हा त्यांच्या डोक्यावर छत्री होती. पण समोर कार्यकर्ते भिजत असल्याचं पाहून शरद पवारांनी छत्री घेण्यास नकार दिला आणि पावसात भिजतच उपस्थितांना संबोधित करायचं ठरवलं.
महायुतीच्या जागावाटपाला उशीर झाल्यानं राज्य विधानसभा निवडणुकीचा प्रचार काहीसा उशिराच सुरू झाला. काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज सत्ताधारी भाजपमध्ये गेल्यानं विरोधी आघाडीवरही शांतता होती. मात्र, शरद पवार यांच्यावर ‘ईडी’नं गुन्हा दाखल केल्यानंतर वातावरण फिरले. ‘ईडी’चा समाचार घेतल्यानंतर पवार प्रचाराच्या मैदानात उतरले. त्यांनी जिल्ह्या-जिल्ह्यात सभा घेऊन त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल सुरू केला. मिश्किल आणि गावरान भाषेतील त्यांच्या भाषणाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मोदी, शहा यांच्यापेक्षा पवारांच्याच भाषणांची चर्चा राज्यभरात सुरू आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रश्न माहीत असलेल्या पवारांनी हे प्रश्न लोकांपुढं मांडत सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर देत आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं