Exit Poll: हरियाणामध्ये भाजपाला धक्का बसण्याची शक्यता

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच हरियाणातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं आहे. मतदान संपल्यानंतर विविध संस्थांनी या निवडणुकांच्या निकालाबाबतचे अंदाज व्यक्त केले आहेत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेचं सरकार येईल, असा अंदाज सर्वच संस्थांच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. परंतु हरियाणाबाबत एका संस्थेनी वर्तवलेल्या अंदाजाने भारतीय जनता पक्षाला धक्का बसला आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही, असा अंदाज इंडिया टुडे-माय एक्सिसच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. विधानसभेच्या एकूण ९० जागा असलेल्या हरियाणात भारतीय जनता पक्षाला ३२ ते ४४ जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवला आहे. तर काँग्रेसला ३० ते ४२ जागा मिळतील, असं या एक्झिट पोलमधून समोर आलं आहे. त्यामुळे देशभरात सुसाट निघालेला भारतीय जनता पक्षाचा विजयरथ हरियाणात अडखळणार का, हे पाहावं लागेल.
२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला ४७ जागा मिळाल्या होत्या. बहुमत मिळाल्याने सरकार बनविले होते. विभाजनाचे इनेलोला मोठे नुकसान होऊ शकते. २०१४ मध्ये इनेलोला १९ जागा मिळाल्या होत्या. सोमवारी दाखविलेल्या एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्षाला ७५ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
सर्व्हेमध्ये भारतीय जनता पक्षाला ३३ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला ३२ टक्के आणि जेजेपीला १४ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. आज तकच्या सर्व्हेनुसार हरियाणामध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही. यामुळे त्रिशंकू स्थिती निर्माण होऊ शकते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं