आदित्य ठाकरे आणि रोहित पवार सुरवातीच्या फेऱ्यांमध्ये आघाडीवर

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सारी तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती की आघाडीची सत्ता येणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. निकालाचा पहिला कल महायुतीच्या बाजूने लागला आहे. जवळपास १०० च्या वर महायुतीने आघाडी घेतली आहे तर महाआघाडी ४० जागांच्या वर आलेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ठाकरे-पवार घराण्यातील नवीन पिढी यंदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे.
वरळीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आघाडीवर आहेत. वरळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश माने यांच्याशी त्यांचा थेट सामना होत आहे. ठाकरे कुटुंबातील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले ते पहिले ठाकरे आहेत. दरम्यान, परळीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे १ हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर भाजपाच्या विद्यमान आमदार पंकजा मुंडे यांचं आव्हान आहे. भावनिक राजकारणामुळे या मतदारसंघात निवडणूक अतिशय चुरशीची ठरली होती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं