हरयाणा निवडणुकीत मोदी हवा ओसरली; राहुल गांधींचा संयमी प्रचार फलदायी

चंदिगड: एकतर्फी विजय मिळवून हरयाणात सत्तास्थापनेसाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आज जोरदात धक्का बसला. आज झालेल्या हरयाणा विधानसभेच्या मतमोजणीचा कौल त्रिशंकू लागला असून, भारतीय जनता पक्षाला ४० जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत ३१ जागांवर विजय मिळवला आहे. हरयाणामध्ये जननायक जनता पार्टी किंगमेकर ठरली असून, जननायक जनता पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत. तर इतरांच्या खात्यात ९ जागा गेल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत राज्यातील १० पैकी १० जागा जिंकल्यानंतर भाजपाने राज्यात ७५ हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवले होते. मात्र आज मतमोजणीमधून समोर आलेले निकाल भारतीय जनता पक्षासाठी धक्कादायक होते. अखेर अटीतीच्या झुंजीनंतर भाजपाची गाडी ४० जागांवर जाऊन अडली. त्यामुळे राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरूनही ९० सदस्य असलेल्या हरयाणा विधानसभेत बहुमतासाठी भारतीय जनता पक्षाला ६ जागा कमी पडल्या.
दरम्यान, निकालानंतर हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीत ‘मोदी लाट’ ओसरल्याचे स्पष्टपणे दिसले. तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘जादू’ दिसली. ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी सभा, रॅली केली त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला असून राहुल गांधींनी घेतलेल्या रॅली व सभेच्या ठिकाणी काँग्रेस उमेदवार विजयी झाल्याचे दिसले आहे.
हरयाणा राज्यात लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे ‘मोदी मॅजिक’ दिसली होती. ती अवघ्या पाच महिन्यात ओसरल्याची स्पष्टपणे दिसले. हरयाणा विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अब की बार ‘७५ पार’ असे लक्ष्य ठेवले होते. परंतु, भारतीय जनता पक्षाला ४० ही संख्या गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. हरयाणात ७५ पार हे लक्ष्य गाठण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी, खासदार हेमा मालिनी, खासदार सनी देओल, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांसह ४० स्टार प्रचारकांनी हरयाणात प्रचार केला. तरीही भारतीय जनता पक्षाला म्हणावे तितके यश मिळाले नाही.
हरयाणा विधानसभेतील पक्षीय स्थिती अशी:
विजयी पक्ष:
भाजप ४०
काँग्रेस ३१
जेजेपी १०
आयएनएलडी १
एचएलपी १
अपक्ष ७
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं