शिवसेनेने मुख्यमंत्री पदावर दावा सांगण्यात काहीच गैर नाही: शरद पवार

बारामती: ‘भाजप आणि शिवसेनेत सत्तास्थापनेसाठी ठरलेल्या फॉर्म्युल्याची अंमलबाजवणी झाली पाहिजे. याचा अर्थ ५०-५० टक्के किंवा त्यांचे जे काही ठरले असेल ते. मागच्या वेळी शिवसेनेच्या चार-दोन गोष्टी राहून गेल्या. मात्र, या वेळी ते काही सहन करतील, असे असे दिसत नाही. त्यामुळे स्वत:चा आब राखूनच शिवसेना सत्तेत सहभागी होईलआणि उद्धव यांच्या या मागणीशी आपण सहमत असल्याचे पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे. “१९९० च्या दशकातही शिवसेना-भाजपाने ५०-५० चे सूत्र वापरले होते. त्यांना सरकार चालवण्याचा अनुभव असल्याने त्यांनी अशा मागणीवर अडून राहण्यात काहीच चुकीचे नाही,” असं पवार म्हणाले. पवारांनी दिलेला हा संदर्भ १९९५-१९९९ काळात शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते तेव्हाचा आहे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. ‘सत्तेत सहभागी होण्यासाठी तरुण पिढीचा पाठिंबा नक्की आहे. मात्र, खुर्ची धरण्यासाठी टीम उभी करावी लागते. आमच्या डोक्यावरील जबाबदारीचे ओझे वाढले असून, भविष्यात तिची पूर्तता करणे कर्तव्य आहे आणि आम्ही ते अखंडपणाने करू,’ अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
चारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीमधून नेत्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्यावरुन केलेली टीका योग्य नव्हती असं पवारांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली टीकाही चुकीची होती असंही पवार म्हणाले. “मुख्यमंत्री हे प्रगल्भ नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेकडे मी फारसे लक्ष देत नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी केलेली वक्तव्य चुकीची होती. मला पद्मविभूषण पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. जर माझ्यामध्ये एवढ्या कमतरता असतील तर मला पुरस्कार का देण्यात आला?” असा सवाल पवारांनी उपस्थित केला.
शिवसेनेची साथ सोडणं भाजपाला महागात पडेल असं शरद पवार म्हणाले आहेत. जनतेनं आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे. सेना भाजपाची युती आधीच ठरली आहे त्यामुळे भाजपा सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीची मदत घेणार नाही अशी प्रतिक्रीया शरद पवारांनी झी २४तासशी बोलताना दिली. इव्हीएम घोटाळ्याबाबत बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं