दिल्ली महिला सुरक्षा; उद्यापासून बसमध्ये १३,००० मार्शल तैनात होणार: केजरीवाल

नवी दिल्ली: बसमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सार्वजनिक बसेसमधील मार्शलची संख्या वाढवून जवळपास १३,००० केली जाईल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले. महिलांच्या सुरक्षिततेबाबत बोलताना केजरीवाल म्हणाले की, ‘मंगळवारपासून अतिरिक्त मार्शल बसगाड्यांमध्ये बसण्यास सुरवात करतील. सध्या दिल्लीत सुमारे ४,४०० बस मार्शल आहेत.
केजरीवाल यांनी नव्याने भरती केलेल्या मार्शलसमूहांशी संवाद साधताना म्हटले की, “प्रत्येक सरकारी बसमध्ये महिलांच्या सुरक्षेची आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवित आहे.” दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममधील कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, “आम्ही दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेला महत्व देण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि बस मार्शल्सची संख्या आपण जितक्या प्रमाणात वाढविली आहे, ती जगातील कोणत्याही शहराच्या तुलनेत अधिक आहे असं ते म्हणाले. .
विशेष म्हणजे आम आदमी पार्टीने (आप) दिल्ली परिवहन महामंडळाच्या (डीटीसी) बसेससाठी महिलांसाठी विनाशुल्क प्रवास करण्याच्या योजनेच्या एक दिवस अगोदर मुख्यमंत्र्यांची घोषणा केली. “रक्षाबंधनाच्या दिवशी मला आमच्या बहिणींना भेट द्यायची आहे की २ ऑक्टोबरपासून सर्व डीटीसी (दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन) व महिलांसाठी क्लस्टर बसमध्ये मोफत सेवा दिली जाईल, ज्यामुळे त्यांची सुरक्षा अबाधित होईल,” असं केजरीवाल यांना मागील महिन्यात प्रसार माध्यमांना माहिती दिली होती.
बस मार्शलच्या संख्येत वाढ होण्याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात १०४ नवीन बसेस देखील वाढ केली आहे. दिल्लीच्या द्वारका परिसरातील बस डेपोमध्ये केजरीवाल म्हणाले की नवीन बस (आणि सेवा) सुरक्षित आणि सोयीस्कर सार्वजनिक वाहतूक पुरविण्याच्या दृष्टीने सरकारचं हे एक मोठे पाऊल आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं