शिवसेनेत लवकरच फूट पडेल; २०-२५ आमदार फडणवीसांच्या संपर्कात: आ. रवी राणा

मुंबई: सध्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेवरून कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तब्बल दहा दिवस उलटले असले तरी अजून पर्यंत सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. त्यात नक्की युतीचं सरकार स्थापन होणार की आघाडीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार याबद्दल देखील राजकीय अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.
शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदासह सर्व सत्तापदांचं समान वाटप करण्याची मागणी लावून धरली. शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम असल्यानं भारतीय जनता पक्षाकडून इतर मार्गांचा वापर केला जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार रवी राणा यांनी खळबळजनक दावा केला आहे.
शिवसेनेचे २० ते २५ आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असा दावा रवी राणा यांनी केला. ‘मागील 5 वर्षांत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलं. त्यांनी राज्याची जबाबदारी अतिशय व्यवस्थितपणे सांभाळली. त्यामुळे पुन्हा एकदा तेच मुख्यमंत्री होतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार रवी राणा यांनी पत्नी नवनीत कौर राणा यांच्यासह आज राज्यपालांची भेट घेतली.
बडनेराचे आमदार असलेल्या रवी राणा यांनी निकालानंतर लगेचच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पाठिंब्याचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं. सत्ता स्थापन करण्यासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा गरजेचा आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचे १०५ उमेदवार निवडून आले आहेत. याशिवाय काही अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ ११८ ते १२० च्या घरात पोहोचलं आहे.
विशेष म्हणजे एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीत दाखल झाले आहेत. ते आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यावयाचा काय? या मुद्याभोवती ही चर्चा फिरणार असल्याचे समजते. निकालानंतर ते देखील पहिल्यांदाच दिल्लीला आले आहेत. आज शरद पवार आणि काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात दिल्लीत चर्चा होणार आहे. महाराष्ट्रातल्या राजकीय पेचावर आता दिल्लीतच तोडगा निघण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींना आता वेग आलाय. महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाच्या बैठका, चर्चा आणि भेटीगाठीचा असणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल ११ दिवसांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहेत. निकालानंतर प्रथमच मुख्यमंत्री फडणवीस भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींना भेटणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेणार आहेत. सत्तास्थापनेमधल्या तिढ्यावर ते या भेटीत चर्चा करणार आहेत.
दरम्यान, खासदार राऊत हे आज राजभवनावर जाऊन राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचे राऊत यांनी सांगितले. सरकार स्थापनेसाठी सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षास सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करावे, अशी विनंती राऊत राज्यपालांना करणार आहेत. यामुळे तर्कवितर्काना उधाण आले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं