तरुण भारत माहिती नाही? स्वयंघोषित अनुभवी पत्रकाराचे अभिनंदनच करावे लागेल: तरुण भारत

नागपूर : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसताना संजय राऊत यांच्यावर तरुण भारत या दैनिकाने पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. एका अग्रलेखावरून एखादा माणूस इतका अस्वस्थ होईल की महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्रांची नावंही विस्मरणात जातील, असे आम्हाला कधीही वाटले नव्हते.
आज महाराष्ट्राची जनता विक्रमाच्या रूपाने प्रश्न विचारतेय् आणि त्याची उत्तरे देणं सोडून आपलं अज्ञान प्रगट करण्याचे काम कुणी करीत असेल तर ते खरंच दुर्दैवी आहे. तरुण भारत माहिती नाही, असे सांगून एकप्रकारे आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे महाराष्ट्रासमोर प्रदर्शन करणार्या स्वयंघोषित अनुभवी पत्रकाराचे अभिनंदनच करावे लागेल अशा शब्दात तरुण भारत या दैनिकाने संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये रंगणारी खडाजंगी कमी होती की काय, म्हणून आता शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ आणि रा. स्व. संघाचे मुखपत्र ‘तरुण भारत’ यांच्यामध्येही कलगीतुरा रंगत आहे. ‘तरुण भारत’ माहित नाही, असं म्हणणारे संजय राऊत ‘अधू दृष्टीचे’ आहेत, अशा शब्दात ‘तरुण भारत’च्या अग्रलेखातून राऊतांचा समाचार घेण्यात आला आहे.
एका अग्रलेखावरुन एखादा माणूस इतका अस्वस्थ होईल, की महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्रांची नावंही विस्मरणात जातील, असं आम्हाला कधीही वाटलं नव्हतं, असा टोला संजय राऊत यांना लगावण्यात आला आहे. तरुण भारत माहिती नाही, असं सांगून एकप्रकारे आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं महाराष्ट्रासमोर प्रदर्शन करणाऱ्या स्वयंघोषित अनुभवी पत्रकाराचे अभिनंदनच करावे लागेल, असा टोमणाही संजय राऊत यांना मारण्यात आला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं