राज्यात 'पुलोद प्रयोग' हा भाजपच्या अधोगतीची सुरुवात ठरणार: सविस्तर

मुंबई: देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिला आहे. विधानसभेचा कालावधी संपण्याच्या एक दिवस आधी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जनतेशी संवाद साधला. यावेळी मित्रपक्ष शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेबाबत त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याचा शब्द भारतीय जनता पक्षाने कधीच दिला नव्हता. तसेच पुढचं सरकार भारतीय जनता पक्षाच स्थापन करेल, असा पुनरुच्चारही फडणवीस यांनी केला.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी सुद्धा भारतीय जनता पक्षाला सडेतोड उत्तर दिलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की पहिल्यांदाच शिवसेना प्रमुख्यांच्या कुटुंबावर खोटारडेपणाचा आरोप. जनता पुरेपूर ओळखून आहे खरे कोण बोलतो आणि खोटे कोण? आमच्यात काय ठरले होते. मी दिल्लीला गेलो नव्हतो. अमित शहा आले होते. फोनवर चर्चेवेळी त्यांनी सांगितले की, तुम्हाला लोकसभेला युतीच्या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद मिळेल. मी त्यांना सांगितले की त्यासाठी मी लाचार नाही. मी माझ्या वडिलांना वचन दिले आहे. यावर त्यांनी म्हटले की ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री. तेव्हाही मी नाही म्हणालो. कारण मारामाऱ्या होतात, वाद होतात. यानंतर शहा मातोश्रीवर आले, माझ्या काळात हे नाते बिघडले माझ्याच काळात दुरुस्त करायचे आहे असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री वाटप मान्य केले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही मान डोलवली.
राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीचे सरकार येण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार असे सांगून काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेबरोबर समन्वय थांबवून बंद केलेल्या दाराला आता घट्ट कडी घातली आहे. दुसरीकडे फडणवीस हे खोटे बोलत असून अशा खोट्या लोकांबरोबर सत्ता कशी काय स्थापन करायची म्हणून आम्ही चर्चेची दारे बंद केली आहेत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही स्पष्ट केल्याने आता भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचे सरकार येणार नाही, हे वास्तव समोर आले आहे.
दुसरीकडे, भाजपने १४५ ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी जोरदार धडपड सुरू केल्याची माहीती भाजपच्या सूत्रांनी दिली.यावेळी मुख्यमंत्री आमचाच असा ठाम निर्धार करणार्या शिवसेनेची पडद्यामागून सुरू असलेली हालचाल आता वास्तवात येण्याचे मार्ग खुले होताना दिसत आहेत. राज्यात ‘शिवस्वराज्य पुरोगामी आघाडी’ सरकार स्थापन होणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
शिवसेनेचे ५६ आमदार असून त्यांना ७ अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिल्याने त्याची संख्या ६३ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आमदार असून ते शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी होतील आणि या सरकारला ४४ काँग्रेस आमदारांचा बाहेरून समर्थन राहील, असा दुसरा पुलोद प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करत आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना पुन्हा पक्षात आणण्यासाठीही चाचपणी केली जात आहे. १९७७ साली वसंतदादा पाटील यांचे काँग्रेस सरकार पाडून शरद पवार यांनी पुलोद सरकारचा प्रयोग केला होता.
पूर्वी राष्ट्रवादीत असलेले आणि आता शिवसेनेचे आमदार झालेल्या एका ज्येष्ठ आमदाराने पुलोद प्रयोगाला पुष्टी दिली आहे. मात्र या अनुभवी आमदारांच्या म्हणण्यानुसार काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार नाही तर सत्तेत सहभागी होईल. शिवसेनबरोबर सत्तेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचा एका मोठा गट उत्सुक आहे. काँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते हे सध्या शरद पवार यांच्याशी संपर्कात असून सत्तेत सहभागी होणारा मोठा गट दिल्लीत सोनिया गांधी यांच्याबरोबर समजुतीचा मार्ग काढत आहेत.
एकीकडे मागील अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंचा धरसोड वृत्तीचा अनेकांना कंटाळा आला होता आणि भाजपसोबत स्वतःची आणि पक्षाची फरफट करून घेताना उद्धव ठाकरेंमध्ये ठाकरी बाणाच नसल्याचं अनेकांचं मत बनल्याचं पाहायला मिळत होते. अगदी सध्याच्या घडोमोडींवर देखील अनेकांना पुन्हा तसंच अपेक्षित होतं. मात्र वास्तविक घडलं त्याउलट, कारण उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यासर्वांनाच फैलावर घेतल्याचं पाहायला मिळालं आणि काय करायचं ते करा मी देखील खंबीर आहे असा सज्जड दमच दिला. मात्र त्यांचा ठाकरी बाणा महाराष्ट्राला आश्चर्यचकित करून गेला जो केवळ स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर राज ठाकरे यांच्यामध्ये पाहायला मिळायचा. मात्र उद्धव ठाकरेंचा तोच ठाकरे बाणा अनेकांना काल आवडल्याचं पाहायला मिळालं आणि त्यांनी निर्णयावर ठाम राहून पक्ष वाढवावा असं म्हटलं आहे. भाजप पक्ष दिल्ली ते गल्ली शिवसेनेला शिस्तबद्ध संपवत आहे हे त्यांना वेळीच उमगलं आहे याचा आनंद आहे, कारण त्याचे दूरगामी परिणाम भविष्यात आदित्य ठाकरे यांच्या पिढीला भोगावे लागले असते असं अनेकांनी म्हटलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं