विधानसभा प्रचाराला न फिरकलेलं गांधी कुटूंब आज राज्यात पवारांमुळे अस्तित्व टिकवून? - सविस्तर

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडून निकाल देखील जाहीर झाले असले तरी सत्ता स्थापनेचा घोळ अजून कायम असल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांचे नेते स्वपक्षाच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते, तेव्हा देशातील सर्वात मोठं गांधी कुटूंब मात्र राज्यातील नेत्यांना एकाकी सोडून दिल्लीत रममाण होते. किंबहुना आपला सुपडा साफ होणार याची त्यांना खात्री असावी म्हणून त्यांनी मेहनत न घेण्याचा निर्णय घेतला असावा.
दुसरीकडे, प्रसार माध्यमांनी देखील काँग्रेसच्या सभांकडे पूर्ण कानाडोळा केला होता आणि एकूण प्रचार दौऱ्यात काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते एकाकी खिंड लढवत होते. त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ आणि ‘पवार जादूची’ कांडी फिरली आणि त्यासोबत राज्यात लुप्त होण्याच्या मार्गावर असलेली काँग्रेस देखील तरली आणि त्यांच्या वाट्याला ४४ जागा देखील आल्या ज्या त्यांना देखील अपेक्षित नव्हत्या.
राहुल गांधी मुंबईमध्ये नसीम खान यांच्यासाठी चांदिवली मतदारसंघात एक धावती सभा घेऊन दिल्लीला रवाना झाले होते आणि त्याठिकाणी सुद्धा नसीम खान यांचा पराभव झाला आणि ती जागा शिवसेनेने जिंकली. काँग्रेसच्या दिल्लीच्या नेत्यांना नगरसेवक पदाच्या प्रचारासाठी जरी आणलं तरी संबंधित मतदारसंघात त्यांना कोणी मतं देईल का याची शास्वती नाही. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभा निवडणुकीत कुठेही विजय प्राप्त झाल्यास दिल्लीतील गांधी घराण्याच्या लॉबी कार्यरत होते आणि ते आपल्या अकलेचे तारे तोडण्यास सुरुवात करतात तसाच प्रकार काल दिवसभरात घडल्याचं पाहायला मिळालं. मुळात अजज मुस्लिम तरी त्यांना मतं देतात का हा देखील प्रश्न आहे. त्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी सौम्य हिंदुत्वाची ड्रामेबाजी करणारे राहुल गांधी कोणताही निकाल लागल्यावर अल्पसंख्याक या विषयावर सखोल अभ्यास करू लागतात.
लोकसभेत एक खासदार निवडून आलेला असताना, विधानसभा निवडणुकीत मात्र पवार जादूने ४४ जागा पदरात पडल्या आणि पक्ष राज्यात जिवंत राहिला. मात्र त्यानंतर सत्ता स्थापनेची चालून आलेल्या संधीत मात्र गांधी कुटूंब सध्या दिल्लीत धुरांदरांसोबत देशभरातील राज्यात होणाऱ्या मतपेटीवर होणाऱ्या परिणामांवर चर्चा विनिमय करत आहेत. त्यात हिंदी पत्ता म्हणजे विशेष करून उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये काँग्रेसचे खासदार जवळपास नगण्य असतात आणि यावेळी तर स्वतः राहुल गांधी देखील पराभूत झाले आणि पण त्यांना केरळने तारले, त्यामुळे आता केरळमध्ये शिवसेनेशी आघाडी केल्यास काय दुष्परिणाम होतील याचा सखोल अभ्यास करत आहेत.
मात्र या सर्वात आधी पक्ष जिवंत तेरी ठेवावा लागेल आणि त्यानंतर पुढचा विचार हे देखील त्यांना अवगत होताना दिसत नाही. महाराष्ट्रा’सारख्या राज्यात देखील त्यांची अस्थिर विचारपद्धती राज्यातील नेत्यांना अंधारात ढकलणारी हे मात्र नक्की आणि हे समजायला स्थानिक आमदार काही मूर्ख नाही आणि त्यामुळेच ८० टक्के आमदार शिवसेनेसोबत जाण्यास उत्सुक आहेत. मात्र गांधी घराण्याचा आणि त्यांच्या आजूबाजूच्या नेत्यांचा सखोल अभ्यास सुरु असल्याने उद्या ३०-३५ आमदार फुटल्यास आश्चर्य मानायला नको अशी परिस्थिती दिल्लीश्वर स्वतःच निर्माण करत आहेत.
दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी राज्यपालांची भेट घेतली त्यावेळी राज्यपालांनी राष्ट्रवादी सत्तास्थापन करण्यास समर्थ आहे का हे सिद्ध करा, मंगळवारी रात्री ८.३० पर्यंत राष्ट्रवादीला मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आपले पत्ते योग्य वेळी उघडणार आहे. शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनासोबत घेऊन राष्ट्रवादी राज्यात महाशिवआघाडीचा प्रयोग यशस्वी करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्याने शरद पवार आज पत्ते उघडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
राष्ट्रपती राजवटीनंतरही बहुमत सिद्ध करू. काँग्रेस नेत्यांची आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत आयोजित केलेली बैठत रद्द करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी दिली. निवडणुकीचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला असला तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यातच राज्याची वाटचाल आता राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने सुरू असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
दरम्यान, निर्धारित वेळेत राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना व अन्य छोट्या पक्षांचे सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. कारण शिवसेनेने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यास १६० पेक्षा अधिक संख्याबळ होऊ शकते. तसेच शिवसेनेला पाठिंबा देण्याकरिता काँग्रेसला अडचणीचे होते. पण राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यात काँग्रेसला काही अडचण येणार नाही.
राज्यपालांचे पत्र प्राप्त झाले असून, आधी काँग्रेसबरोबर चर्चा केली जाईल. त्यानंतर शिवसेना व छोट्या पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करू. यानंतरच सरकार स्थापण्याचा दावा करायचा की नाही याचा निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
दुसरीकडे काँग्रेसच्या या आडमुठेपणामुळे शरद पवार अत्यंत नाराज झाले असले तरी केंद्राच्या दादागिरीसमोर न झुकण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून, राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास त्याविरोधात दौरा करणार असल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले. या आंदोलनात शिवसेनेलाही सोबत घेण्याबाबत विचार सुरू असून, सोमवारी उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेतही त्यांनी या शक्यतेबाबत विचार केल्याचे पवार यांच्या निकटवर्तीयांनी बोलून दाखवले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं