शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या तुटपुंज्या मदतीवरून सेनेचे खासदार केंद्राला जाब विचारणार

नवी दिल्ली: संसदेचे हिवाळी अधिवेशन आज, सोमवारपासून सुरुवात होत असून यामध्ये बहुचर्चित नागरिकत्व (सुधारणा) विधेयक मंजूर करून घेणे; तसेच कॉर्पोरेट कर कमी केल्याचा वटहुकूम आणि ई-सिगारेटवर बंदी घातल्याच्या वटहुकमाला कायद्याचे रूप या अधिवेशनात सरकारकडून दिले जाण्याचीही शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती, आर्थिक मंदीसदृश परिस्थिती, बेरोजगारी हे मुद्दे अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. अधिवेशनाची (Parliament Winter Session) सांगता १३ डिसेंबर रोजी होणार आहे.
भारतीय जनता पक्षाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचे संसदेच्या दोन्ही सभागृहांत स्वतंत्र अस्तित्व पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांना मिळालेली तुटपुंजी मदत यावरून शिवसेनेचे खासदार शून्य प्रहरात केंद्र सरकारला धारेवर धरणार आहेत. शिवसेनेच्या खासदारांसाठी लोकसभा व राज्यसभेत स्वतंत्र आसन व्यवस्था राहणार आहे. शिवसेनेचे (Shivsena party) लोकसभेत १८ सदस्य तर राज्यसभेत ३ सदस्य आहेत. लोकसभेत एनडीएचे ३८० सदस्य आहेत. त्यापैकी शिवसेनेचे १८ सदस्य कमी झाल्याने एनडीएची सदस्यसंख्या ३६२ झालेली आहे. विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असली तरी, अजून काँग्रेसप्रणीत यूपीएमध्ये सामील झालेली नाही.
हिवाळी अधिवेशन १३ डिसेंबपर्यंत चालणार असून त्यात २७ विधेयके मंजुरीसाठी दोन्ही सभागृहांमध्ये मांडली जाणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात २८ विधेयके मंजूर करण्यात आली होती. त्यात जम्मू-काश्मीरचे विभाजन आणि विशेष अधिकार रद्द करणारे विधेयक, अवैध कृत्य प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक मंजूर करून व्यक्तीला दहशतवादी ठरवण्याचा हक्क तपास यंत्रणांना देण्यात आला होता.
मांडली जाणारी महत्त्वाची विधेयके :
- व्यक्तिगत माहिती संरक्षण
- तृतीयपंतीयांचे हक्क आणि संरक्षण
- इलेक्ट्रिक सिगरेट प्रतिबंध
- औद्योगिक क्षेत्रासोबत निगडित संहिता
- कर दुरुस्ती विधेयक
- चिट फंड दुरुस्ती विधेयक
- सरोगसी नियंत्रण विधेयक
आम्हाला ट्विटरवर फॉलो करा
आज पासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात. शिवसेना खासदार महाराष्ट्रात राज्यपालांकडून जाहीर झालेल्या तुटपुंज्या मदतीवरून संसदेत जाब विचारणार – https://t.co/QWw5hLHXJg@ShivSena @rautsanjay61 @ianildesai @BJP4Maharashtra pic.twitter.com/Em3wkc5tdK
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) November 18, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं