मानवनिर्मित चुकांमुळे आणि नैसर्गिक बदलांमुळे देश भीषण बेरोजगारीकडे: सविस्तर वृत्त

मुंबई: जर भारतीय अर्थव्यवस्थेतील सुस्ती कायम राहिली तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या या वर्षात आपल्या ३० ते ४० हजार कर्मचाऱ्यांना कमावरुन कमी करु शकतात, अशी भीती इन्फोसिसचे माजी चीफ फायनान्शिअल ऑफिसर (सीएफओ) मोहनदास पै यांनी दोन दिवसनपूर्वी व्यक्त केली होती. आयटी क्षेत्रात प्रत्येक ५ वर्षांनंतर हजारो लोकांच्या नोकऱ्या या प्रकारे जातात. कारण, ५ वर्षांत आयटी क्षेत्रात मोठे बदल होत असतात आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना नोकऱ्यांतून काढले जाते, असे पै यांनी म्हटले होतं.
तत्पूर्वी स्टील उत्पादनातील आघाडीची भारतीय कंपनी असलेल्या टाटा स्टीलने सध्या युरोपात घटलेली मागणी आणि जागतिक पातळीवर मागणीपेक्षा जास्त उत्पादनक्षमतेची स्थिती यांना तोंड देण्यासाठी मोठ्या प्रमाणात फेरबदल व खर्चात कपातीचे धोरण हाती घेतले असून त्याअंतर्गत युरोपातील सुमारे तीन हजार कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून या नोकरकपातीला दुजोरा देण्यात आला होता.
नोकऱ्या कमी होण्यास केवळ मानवनिर्मित कारणं राहिली नसून बदलत्या हवामानामुळे नोकऱ्यांमध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे. मागच्यावेळी उष्णतेची तीव्र लाट भारतामध्ये पाहायला मिळाली. या तापमानवाढीचा तडाख्यामुळे माणसाच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच परंतु, या हवामान बदलाचा नोकऱ्यांवर देखील चांगलाच परिणाम होणार आहे. या उष्णतेमुळे हीट स्ट्रेसच्या त्रासाला सगळ्यांना सामोरे जावे लागते आणि अहवालानुसार वाढत्या उष्णतेमुळे २०३० पर्यंत भारतात ३ कोटी ४० लाख नोकऱ्या कमी होणार असा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे जगातील नोकऱ्यांमध्ये घट होणार असून या नोकऱ्या ८ कोटींवर येतील.
इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन सादर केलेल्या अहवालानुसार, या उष्माघाताचा भारत देशाला सर्वाधिक फटका बसण्याचा धोका आहे, असे सांगण्यात आले आहे. तसेच, भारतामध्ये बहुतांश लोकसंख्या शेती आणि उत्पादन क्षेत्रावर अवलंबून असल्याने बऱ्याच जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहे, असे देखील या अहवालात म्हटले आहे.
भारताचे दरडोई उत्पन्नांपैकी शेतीचा हिस्सा १५ टक्के आहे. अशा स्थितीत शेतीचं उत्पन्न कमी झाल्यास त्याचा परिणाम दरडोई उत्पन्नावर होऊन शेती आणि उत्पादन क्षेत्राला जर याचा जास्त फटका बसलाच तर भारतावर बेरोजगारीचे संकट येण्याचा धोका असल्याचे नाकारता येत आहे. तामिळनाडूचे शेतीशास्त्रतज्ञ आर. मणी यांनी या शक्यतेबद्दल असे सांगितले की, हवामान बदल आणि तापमानवाढीचा सगळ्यात जास्त फटका शेतीलाही बसणार आहे. वाढत्या उष्म्यामुळे शेतीची उत्पादकता सुमारे ९ टक्क्यांनी खाली घसरणार आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेवर आलेले मंदीचे मळभ अद्याप दूर झालेले नाही. प्रत्येक तिमाहीगणिक अर्थव्यवस्थेतील सुस्ती वाढत चालली आहे. त्यामुळे नव्या नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता धुसर झाली आहे. त्याबरोबरच खर्चात कपात करण्यासाठी कंपन्या वरिष्ठ आणि मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. त्यामुळे २०१४ पासून आतापर्यंत केवळ उत्पादन क्षेत्रातील ३५ लाख कर्मचाऱ्यांनी रोजगार गमावला आहे.
अर्थव्यवस्थेतील सुस्तीमुळे विविध क्षेत्रांमधील लाखो रोजगार संकटात आहेत. आयटी कंपन्या, ऑटो कंपन्या, बँका अशा विविध क्षेत्रांमधून खर्चांमध्ये कपात करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे परिस्थिती याहून अधिक बिकट होईल, अशी भीती कर्मचाऱ्यांना सतावत आहे. मोठमोठ्या आयटी कंपन्यांनी कामगार कपातीची घोषणा केली आहे, तर काही कंपन्या कामगार कपातीची घोषणा करण्याच्या तयारीत आहेत. याचा सर्वात मोठा फटका वरिष्ठ आणि मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांन बसत आहे.
आधीच जागतिक स्तरावरील नोकऱ्यांची कमतरता असताना आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे म्हणजे तंत्रज्ञानाच्या ऑटोमेशनमुळे रोजगारांवर मोठं संकट येण्याची शक्यता आहे. कारण याच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे जगभरातील ७ कोटींपेक्षा अधिक जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागू शकतात, असा अहवाल एका जग विख्यात संस्थेने प्रसिद्ध केला आहे.
याच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे मनुष्य करू शकेल अशी अनेक कामं मशिन्सच्या माध्यमातून होतील आणि त्यामुळे कोट्यवधी लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागतील आणि बेरोजगार होण्याची वेळ येईल. अगदी अकाउंटिंग, ड्रायव्हर, डाटाएंट्री पासून ते थेट रिसेप्शन आणि शॉपिंगसारखी असंख्य कामं ही भविष्यात आता मशिन्सच्या माध्यमातूनच होणार आहेत. या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे चुकांची शक्यताही जवळपास संपुष्टात येते तसेच उत्पादकताही वाढते. त्यामुळं कोणतीही छोटी मोठी मनुष्य आधारित कामं तसेच उच्च दर्जाची काम सुद्धा याच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे होणार आहेत.
या अहवालात सूचित करण्यात आल्याप्रमाणे पुढील ७ वर्षांमध्ये मनुष्याची अर्ध्यापेक्षा अधिक कामं म्हणजे जवळपास अंदाजे ५२ टक्के कामं ही ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आधारित मशिन्स करतील. सध्या मनुष्याच्या एकूण कामांपैकी केवळ २९ टक्के कामं ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आधारित मशिन्स करतात आणि प्रमाण भविष्यात थेट ५२ टक्क्यांवर जाणार आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आधारित मशिन्समुळे अगदी डॉक्टर्स, प्राध्यापक, पत्रकार, टेक्नेशियन्स, व्हेंडर्स, ऑपरेटर्स, विश्लेषण करणारे तज्ज्ञ, व्हिडीओ एडीटर्स, कॅमेरामन्स अशा एक ना अनेक क्षेत्रांमध्ये नोकरी जाण्याचा मोठा धोका भविष्यात आहे. त्यामुळे उद्योगांची वेतनावर होणारी प्रचंड अर्थशक्ती बचत होणार आहे. त्यामुळे केवळ जगभरातीलच नव्हे तर भारतातील अनेक दिग्गज कंपन्यांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’वर प्रचंड गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असून कामगार, पगार आणि कर्मचाऱ्यांना द्याव्या लागण्याच्या सुविधा या पासून स्वतःची सुटका करण्यासाठी घेण्यासाठी आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी मालकांनी गुणतवणूक खर्ची घालण्याचे निर्णय घेतले आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं