विधानसभेतल्या मोठया अपयशानंतर वंचित'मध्ये फूट; आनंदराज आंबेडकरांची सोडचिठ्ठी?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत सुपडा साफ झाल्यानंतर केवळ वंचित आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या किती जागा पडल्या यावरच चर्चा रंगली होती. दरम्यान, विधानसभेच्यावेळी काँग्रेस-राष्ट्र्वादीने अनेक प्रस्ताव समोर ठेऊन देखील प्रकाश आंबेडकरांनी आघाडीत सामील न होता, केवळ अवास्तव मागण्या करून चर्चेत राहिले. वंचित बहुजन आघाडी इतिहास रचनार असं काहीसं चित्र उभं करण्यात आलं.
परिणामी, काँग्रेस आघाडीला मदत करणारे आनंदराज आंबेडकर देखील वंचित बहुजन आघाडीत सामील झाले. मात्र प्रत्यक्ष निकालानंतर वंचितला एकही जागा जिंकता आली नाही. इतकंच काय तर अकोल्यात देखील तेच चित्र पाहायला मिळालं. परिणामी, वंचित आघाडी केवळ भाजपाला प्रत्यक्ष मदत करत असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. निवडणुकीपूर्वीच इतर वरिष्ठ नेते देखील वंचितला सोडून तरी आता आनंदराज आंबेडकर यांनी देखील वंचितला सोडचिट्टी दिली आहे.
दरम्यान, सध्याच्या राजकीय स्थितीमुळे प्रकाश आंबेडकर यांची राजकीय हवाच निघून गेली आहे. त्यात जोगेंद्र कवाडे काँग्रेस-राष्ट्र्वादीसोबत असताना आणि त्यात रामदास आठवले देखील सध्या भाजपमध्ये असून देखील शरद पवारांच्या घरी घिरट्या मारू लागले आहेत. त्यामुळे बदललेल्या राजकीय समीकरणामुळे वंचित राजकारणातून वंचितच राहणार असंच चित्र आहे.
विशेष म्हणजे रिपब्लिकन सेनेच्या वर्धापन कार्यक्रमात याबाबतची ते घोषणा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दादर येथील आंबेडकर भवनात रिपब्लिकन सेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार असून वंचितमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा रिपब्लिकन सेनेत येण्यासाठी ते अवाहन करणार आहेत. आनंदराज आंबेडकर हे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांचे धाकटे बंधू आहेत. आनंदराज आंबेडकर यांनी वंचितला सोडचिठ्ठी देण्याबाबतचा निर्णय घेणे हे प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं