धनंजय मुंडेंसहित इतर ८ आमदार राष्ट्रवादीत परतले

मुंबई: राज्याच्या राजकारणातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला असेच म्हणता येईल कारण राज्यात महाविकासआघाडीची एकीकडे सत्तास्थापनेची तयारी सुरु असताना हा राजकीय भूकंप झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी आणि भाजपाचं नवं सरकार स्थापन स्थापन झाले आहे. राज्यपालांच्या उपस्थित देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून त्यांच्या नंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ अजित पवारांनी देखील शपथ घेतली आहे. सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी हा शपथविधीचा सोहळा पार पडला.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शपथविधी कार्यक्रमापासून त्यांचे मोठे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी आहेत. त्यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ हे अजित पवार यांच्या भेटीला गेले होते. मात्र, त्यांची मनधरणी करण्यात राष्ट्रवादीला अपयश आल्याचं दिसून येत आहे. अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर बाहेर पडलेल्या तिन्ही नेत्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं.
भाजपा-राष्ट्रवादीच्या या सोयरीकीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांनी तोडकीच प्रतिक्रिया दिली होती. मात्र, फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदीजी है तो मुमकीन है… असे म्हणत केंद्र सरकारच्या पुढाकारानेच ही खेळी यशस्वी ठरल्याचे संकेत दिले आहेत. राज्यात पुन्हा एकदा वेगवान घडामोडी पाहायला मिळताहेत आणि शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वाक् युद्ध रंगताना दिसतंय. तर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येते.
मात्र शरद पवारांनी अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांशी संवाद साधला. यातील आतापर्यंत ७ आमदार पक्षात पुन्हा परतले आहेत. यामध्ये दिलीप बनकर, नानासाहेब झिरवळ, माणिकराव कोकाटे, संदीप क्षीरसागर, सुनील भुसारा, डॉ. राजेंद्र शिंगणे आणि सुनील शेळके असे आमदार राष्ट्रवादीसोबत कायम राहिलेले आहेत. अजित पवारांनी या आमदारांना फोन करुन बंगल्यावर येण्याचे आदेश दिले होते. परंतु यातील बहुतांश आमदारांना अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत याची कल्पनादेखील देण्यात आली नव्हती. विधिमंडळ नेत्याचे आदेश आल्याने हे सर्व आमदार अजित पवारांसोबत राजभवनात गेले होते. त्यामुळे अजित पवारांनी आमदारांना फोडण्याची रणनीती बनविल्याची चर्चा आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं