राष्ट्रवादी'मार्गे मनसेचे राजू पाटील देखील मंत्रिमंडळात जाण्याची शक्यता? सविस्तर वृत्त

मुंबई: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांची जवळीक पाहायला मिळाली होती. केवळ राज्यातील नव्हे तर देशातील सर्व विरोधकांना भाजप म्हणजे मोदी-शहा यांच्या हिटलरशाही विरुद्ध एकत्र येण्याचं जाहीर आवाहन केलं होतं. प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने ऐतिहासिक निर्णय घेतला आणि थेट मोदी-शहांशी राष्ट्रीय पंगा घेत एनडीए’मधून बाहेर पडले. विशेष म्हणजे एकूण घडामोडींबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकासआघाडीवर कोणतीही टीका केली नव्हती.
विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी एका मुलाखतीत जेव्हा राज ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांच्या निवडणुकीत उतरण्याच्या प्रश्नावर देखील ‘आदित्य माझा मुलासारखाच आहे आणि आत्ताच्या पिढीला वाटत असेल तसं तर त्यात काही चुकीचं नाही’ असं उत्तर दिलं होतं. मनसे-शिवसेनेचे कार्यकर्ते समाज माध्यमांवर एकमेकांवर टीकेचा आसूड ओढताना दिसले, ठाकरे कुटुंबीय अडीअडचणीच्या आणि कौटुंबिक सोहळ्यात एकत्र दिसले आणि राजकारणापलीकडे नाती जपली.
अगदीच राज ठाकरे यांना जेव्हा सूडबुद्धीने ईडीच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाला तेव्हा दादुने भावाचीच बाजू घेतल्याचं सर्वश्रुत आहे. मोदी-शहा यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर देखील पराभूत करायचे झाल्यास राज ठाकरेंसोबत असणे हे गरजेचे आहे. त्यात त्यांना दूर महाविकासआघाडीपासून दूर ठेवल्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत अत्यंत चुकीचा संदेश मराठी मतदारात जाईल आणि तो म्हणजे उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी या विरोधी टोकाची भूमिका असलेल्या पक्षांसोबत घरोबा केला, मात्र तोच दिलदारपणा भावाच्या बाबतीत का नाही दाखवला आणि यामुळे त्यांचीच भविष्यात बाजू मराठी माणसाच्या मनात कमकुवत होईल.
उद्या उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री बनतील, पण महत्वाचं म्हणजे ठाकरे घराण्यातील ते पहिल उदाहरण असेल. त्यांचा शपथविधी गुरुवारी शिवाजी पार्कवर होणार असल्याची माहिती शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दिली. या शपथविधीला उद्धव ठाकरे यांचे चुलत बंधू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या निमित्ताने पहिल्यांदाच ठाकरे कुुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे.
उद्धव ठाकरे हे स्वत: राज ठाकरेंना शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण देण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र आता थेट राज यांना उद्धव ठाकरे शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण देणार असल्याचे समजते. आज संध्याकाळच्या सुमारास ते राज यांची भेट घेऊन अथवा फोनवर या सोहळ्याला उपस्थित राहण्यासंदर्भात आमंत्रण देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ठाण्याचे विद्यमान महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला यांचीही नावे विधानपरिषदेसाठी पुढे आले आहे. विशेष म्हणजे मनसेचे राज्यातील एकमेव आमदार राजू पाटील यांच्या वाट्यालाही राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यमंत्री पद येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच राज्याच्या सत्तासमीकरणात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या ठाणे जिल्ह्याला मंत्रिमंडळातही मानाचे स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे मागील कित्येक वर्षांपासून महत्वाच्या पदांसाठी डावलले गेलेले शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांना येत्या काही महिन्यांत नव्या समीकरणामुळे बढती मिळण्याची चिन्हे आहे. पक्षाकडून त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. तसेच शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना महत्वाची खाती मिळणार असल्याचे बोलले जात आहे. आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक यांचीही नावे आता आघाडीवर आली आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं