मुंबई एमआयडीसी पोलिसांचा फेक कॉल सेंटरवर छापा; १९ अटकेत

मुंबई: मुंबईमध्ये कॉर्पोरेट जगतात देखील अनेकांना गंडा घालण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. परदेशातील नागरिकांना गंडा घालण्यासाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरात चक्क खोटे कॉल सेंटर थाटल्याचे याआधी देखील अनेक प्रकरणं समोर आली आहेत. तसाच अजून एक प्रकार मुंबईतील एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत घडत असल्याचा सुगावा स्थानिक पोलसांना लागला होता आणि त्यावर थेट छापा मारत MIDC पोलिसांनी तब्बल १९ आरोपींना ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.
प्रसार माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, मरोळस्थित एका कॉल सेंटरमधून अमेरिकेतील तब्बल ४,००० ग्राहकांना १० कोटी रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. संबंधित कंपनीने मरोळमधील मांगल्य साफल्य इमारतीत फेक कॉल सेंटर थाटून परदेशी नागरिकांना जाळ्यात ओढण्याचे वरेकर प्रकार सुरु केले होते. सदर ठिकाणी छापा घालून एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी रात्री १९ जणांना अटक केली असून त्यांची सखोल चौकशी केली जातं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य सूत्रधार आरिष लोखंडवाला, मुनाफ शेख, झाकिर रेहमान यांचा पोलीस अजून शोध घेत आहेत.
सध्या ‘क्रेडीट स्कोअर’ कमी असल्यास कर्ज मिळण्यात अडचणी येतात, कारण कर्ज मिळण्याचा तोच मूळ आधार बँकांनी आज केला आहे. अशा ग्राहकांना शोधून त्यांना वित्त संस्थांकडून कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्यात आली आहे. यासाठी आरोपी अलरिफ ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे नाव सांगून ग्राहकांना ‘कॅश मी ऑन’ या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्यास सांगितले जात असे. त्यामुळे या ग्राहकांचा सर्व डेटा या कॉल सेंटरकडे जमा होत असे.
त्यानंतर संबंधित कर्ज मंजुरीसाठी या ग्राहकांकडून रद्द धनादेश घेतले जात. हे धनादेश सॉफ्टवेअरचा मदतीने बदलून घेतले जात असत. बदलेल्या धनादेशाचा आधार घेत ही टोळी त्या ग्राहकाच्या खात्यातून पैसे काढून ते दुसऱ्या व्यक्तींच्या खात्यावर वळते करत होती. तसेच ज्या ग्राहकाच्या खात्यावर पैसे पाठविले आहेत, त्याला हे पैसे तुमचे कर्ज खाते सुरू करण्यासाठीची प्रोसेसिंग फी म्हणून पाठविण्यात आल्याची बतावणी करीत. तसेच त्याला वॉलमार्ट कार्ड, ई बे कार्ड, गेम्स टॉप्स, सिफोरा, टार्गेट आदी कंपन्याचे गिफ्ट कार्ड खरेदी करून रक्कम वळती करण्यास सांगण्यात येत होते, अशी माहिती पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी दिली.
प्रति महिना याच कॉल सेंटरमधून ५०० परदेशी नागरिकांना एक कोटी रुपयांना लुटले जात होते, अशी शक्यता MIDC पोलिसांनी व्यक्त केली आहे. या कॉल सेंटरमधून प्रतिदिन १६०० कॉल केले जात. मरोळमध्ये अशा पद्धतीचे कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती MIDC पोलिसांना प्राप्त होताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण तसेच ATC पथक आणि सायबर सेल पथकाच्या मदतीने सदरची कारवाई यशस्वीपणे पार पडली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं