सुरेश धस यांची विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदासाठी पंकजा मुंडेंविरोधात मोर्चेबांधणी

मुंबई: एकीकडे पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद मिळावं, यासाठी कार्यकर्त्यांची मागणी जोर धरत असताना, दुसरीकडे आता भाजप आमदर सुरेश धस यांच्याकडून देखील विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी मोर्चेबांधणी सुरु असल्याचं वृत्त आहे आणि ते स्वतः फडणवीसांच्या संपर्कात असल्याचं समजतं. त्यामुळेच सुरेश धस यांच्या सर्मथकांनी अचानक विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद सुरेश धस देण्याची जोरदार मागणी सुरु केली आहे. विशेष म्हणजे एकाबाजूला बीडमधील कट्टर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता असताना दुसरीकडे पंकजा मुंडे यांना बीडमधूनच पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी निर्माण करण्याची रणनीती आखली जातं आहे असं वृत्त आहे.
यापूर्वी पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद किंवा राज्याचे प्रदेशाध्यक्षपद द्यावं अशी मागणी मुंडे समर्थकांनी केली होती. पंकजा मुंडे यांचं बंड शांत होते ना होते तोच आता भारतीय जनता पक्षाच्या बीडमधीलच आमदार सुरेश धस यांनी मोर्चेबांधणी सुरु केल्याने नेमकं भाजपमध्ये काय सुरु आहे याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे विषय गंभीर असून देखील स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांची प्रत्यक्ष भेट का घेतली नाही याची भाजपमध्ये चर्चा रंगली आहे.
दरम्यान, यावर प्रसार माध्यमांनी एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला असता, योग्य वेळी तुम्हाला सर्वकाही दिसून येईल असं उत्तर दिलं आहे. जस जशा निवडणुका येतील, त्या त्या वेळी योग्य काय ते दिसून येईल. पंकजाताईंची काही भेट घेतलेली नाही. पंकजाताईंची भेट घेण्याची काही आवश्यकता नाही. गोपीनाथ गडावर मी दरवर्षी जातो आणि आताही जाणार आहे. या वर्षीसुद्धा जाणार आहे. सध्या तरी वेगवेगळे मतप्रवाह समोर आलेले नाहीत असं खडसे म्हणाले.
तत्पूर्वी, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी “ओबीसी असल्यानेच पंकजा यांचं खच्चीकरण केलं जात असून, त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा. स्व. गोपीनाथ मुंडे यांनाही पक्षातून काढून टाकण्याचा ठरावही भाजपाने केला होता. मात्र, त्याला विरोध केल्यानं तो ठराव फेटाळण्यात आला. तोच प्रकाश पंकजा मुंडे यांच्यासोबत केला जात आहे,” प्रकाश शेंडगे म्हणाले होते. शेंडगे यांच्या आरोपानंतर भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं