आधी विष्णूचा अवतार, मग छत्रपती शिवाजी महाराज, आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी मोदींची तुलना

मुंबई: उद्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबरला ६३वा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशभरातून २५ लाखांहून अधिक अनुयायी दादर चैत्यभूमी येथे येतात. या अनुयायांना शहरातील विविध ठिकाणी नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे. त्याअनुषंगाने भाजप अशी वातावरण निर्मिती करत असल्याची चर्चा रंगली आहे आणि पुन्हा मोदींना केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतं आहे असं म्हटलं आहे.
यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींनी अनेक महापुरुषांशी आणि देवी-देवतांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ यांनी मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती, तर भाजपच्या प्रवक्त्यांपासून ते देशपातळीवरील नेत्यांनी मोदी आम्हाला भगवान विष्णू समान असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबरला ६३वा महापरिनिर्वाण दिन असल्याने पुन्हा अशक्य असलेल्या तुलना भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी सुरु केल्या आहेत.
तसंच वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेवरील खासदार अमर साबळे एका मुलाखतीत केलं आहे. त्यावेळी साबळे म्हणाले की, भारतीय जनता पक्षामध्ये ओबीसी समाजातील नेत्यांवर अन्याय होत असल्याच्या उलटसुलट चर्चा सध्या सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर ओबीसी वर्गाला भारतीय जनता पक्षात आजिबात डावललं जात नसल्याचे भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी म्हटले आहे. तसेच ओबीसी वर्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानिक अधिकार मिळवून दिला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे ओबीसींचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, अशा शब्दांत खासदार साबळे यांनी मोदींचे कौतुक केले आहे.
अमर साबळे म्हणाले की, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या वर्गाला सभागृहात प्रतिनिधित्व मिळायला हवे. त्याचप्रमाणे या वर्गामधील नागरिकांच्या समस्या त्यांच्या माध्यामातून मांडल्या गेल्या पाहिजे. याच भावनेने संविधानामध्ये आरक्षणाबाबतची तरतूद करण्यात आली होती. या तरतुदीची मुदत जानेवारीत संपत असताना मोदी सरकारने ही मुदत १० वर्ष वाढविण्याचा निर्णय घेतल्याने समाजात समाधानाचं वातावरण असल्याचे अमर साबळे यांनी स्पष्ट केलं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं