२ लाखांवरच्या कर्जधारकांसाठी नवीन योजना आणणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: महाराष्ट्रात सत्तेत आलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाआघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पार पडला आहे. कोणालाही नाराज न करता हा ३ मित्रपक्षांचा मंत्रिमंडळ विस्तार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मंत्रिमंळ विस्तारानंतर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी जाहीर पत्रकार परिषद घेत दिली. या विस्तारांनंतर आता २-३ दिवसांमध्ये खातेवाटप होईल असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची विस्तारानंतर पहिली मंत्री परिषद पार पडली. pic.twitter.com/lynUr1WBAU
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 30, 2019
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी २ लाखांवरच्या कर्जधारकांसाठी नवीन योजना आणणार आहेत. तसेच, नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी वेगळी योजना लागू करण्यात येणार आहे. सध्या शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी दिली आहे. आधीच्या सरकारपेक्षा ५० हजारांनी ही रक्कम वाढविली आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य सरकार मंत्रिमंडळ! pic.twitter.com/9rhjb8q9p3
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 30, 2019
Web Title: Chief Minister Uddhav Thackeray First Conference after Maharashtra State Cabinet Expansion.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं