मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ ८ जानेवारीला देशव्यापी संप

मुंबई: केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांनी ८ जानेवारी रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपात शिवसेनेची भारतीय कामगार सेनादेखील सहभागी होणार आहे. शिवसेना व भारतीय कामगार सेना सक्रियपणे या संपात सहभागी होणार असल्यामुळे संपाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मोदी सरकारच्या कामगारविरोधी आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने देशव्यापी संप आणि आंदोलनाची हाक दिली आहे. विशेष म्हणजे डाव्यांच्या या संपामध्ये शिवसेनेची भारतीय कामगार सेना देखील सहभागी होणार आहे. या संपाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी उपस्थिती लावली.
८ जानेवारी कामगारांचा देशव्यापी संप ………२ कोटी नोकऱ्या देणार होते, ५ कोटी नोकऱ्या गेल्या. रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत करणार होते. पण १ लाख ६७ हजार कोटी रुपये आरबीआयतून ओरबडले – खासदार संजय राऊत#मुंबई मराठी पत्रकार संघ@rautsanjay61 @ShivSena @OfficeofUT @narendramodi pic.twitter.com/fULX5su3Tw
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) January 3, 2020
कामगारांच्या देशव्यापी संपाला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आदी राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या संपात केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी संघटना, बँक, विमा, पोर्ट ट्रस्ट, संरक्षण, बीपीसीएल, एचपीसीएल, बीएसएनएल, एमटीएनएल, टॅक्सी, रिक्षा, एसटी, बेस्ट, मालवाहतूकदार, अंगणवाडी, आशा वर्कर्स, घरकामगार, माथाडी कामगार, घर बांधकाम कामगार, महापालिका कामगार आदी क्षेत्रातील, आस्थापनांतील कामगार सहभागी होणार आहेत.
Web Title: Shivsena party workers union will actively participate during Nationwide workers strike on 8th January.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं