शेतकऱ्याचा 'मातोश्री'त घुसण्याचा प्रयत्न

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकरी वडील आणि त्यांच्या लहान मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पनवेलवरून वांद्रे येथील मातोश्री येथे आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दोघंही आज दुपारी १२ च्या सुमारास मातोश्रीवर जाण्याच्या प्रयत्नात होते. आपल्या शेताच्या कर्जा संदर्भात झालेला गैरप्रकार सांगण्यासाठी ते रविवारी ‘मातोश्री’वर आले होते अशी प्राथमिक माहिती आहे.
देशमुख यांच्यासोबत एक फाइलही होती. बँकेच्या कर्जासंदर्भात ते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी या कर्जासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयात अर्जही केला होता. त्यावर त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून पोचपावतीही देण्यात आली होती. तरीही त्यांची समस्या सुटली नव्हती. त्यामुळे निराश झालेल्या देशमुख यांनी आज थेट मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर सदर शेतकऱ्याला आणि त्यांच्या मुलीला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवले. त्यानंतर त्यांना खेरवाडी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. तेथे त्यांच्याकडून प्राथमिक माहिती घेण्यात येत आहे. दरम्यान, मातोश्रीवर भेटण्यासाठी अनेक लोक येत असतात. त्यामुळे त्यांना अटकाव करण्यासाठी असे वागावे लागते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
Web Title: Farmer father and daughter tried to enter in CM Uddhav Thackerays Residence house Matoshree.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं