संघ विचारांच्या कुलगुरूंच्या नियुक्त्या रद्द करा: आशिष देशमुख

मुंबई: संघ विचारांच्या कुलगुरु आणि प्र कुलगरु यांच्या नियुक्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) संघाच्या विचारांचे कुलगुरु आहेत, त्यामुळे तेथे काय झालं हे सर्वांनी पाहिलं आहे. तशी स्थिती राज्यात निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचं आशिष देशमुख यांनी सांगितलं.
जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर जो हल्ला झाला त्यामध्ये एबीवीपी आणि भारतीय जनता पक्षाच्या गुंडांना नक्कीच तेथील विद्यापीठ प्रशासनाची साथ मिळाली असणार आहे. जेएनयूचे कुलकुरु जगदीश कुमार हे देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच आहेत. गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कार्यकाळात राज्यातील प्रत्येक विद्यापीठांमध्ये कुलगुरु, प्र-कुलगुरु आणि निबंधक या पदांवर संघाच्या विचारांच्या लोकांना भरणा झाला आहे. त्यामुळे माझी उद्धव ठाकरे यांना विनंती आहे की, जेएनयू सारखी स्थिती राज्यातील विद्यापीठांमध्ये तयार होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून विद्यापीठांमधील संघाच्या विचारसरणीच्या कुलगुरुंच्या नियुक्त्या रद्द केल्या पाहिजेत, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली.
दरम्यान, संघ विचारांच्या कुलगुरु आणि प्र. कुलगुरुंच्या नियुक्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली असून सरकार विनाकारण राजकारण करत असल्याचं म्हटलं आहे. आशिष देशमुख यांची मागणी आवाजवी आणि मुद्दाम उकरुन काढण्यात आली आहे. बदला घेण्याच्या भावनेनं सरकार राजकारण करत आहे. संघ विचारांचे कुलगुरु असले म्हणून ते पाकिस्तानवादी होत नाहीत, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.
राजकारण करणाऱ्याला जनता उत्तर दिईल. आशिष देशमुख कोणत्या विद्यापीठात शिकलेत हे माहीत नाही. पण जेएनयूसारख्या घटना इतर विद्यापीठात का घडत नाहीत?, असा सवाल शेलारांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या कार्यकाळात संघ विचारांच्या कुलगुरु आणि प्र. कुलगुरुंच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यामुळे जेएनयूसारखा प्रकार महाराष्ट्रात घडू नये यासाठी या नियुक्ता रद्द करण्यात याव्या. यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं.
Web Title: Congress Leader Ashish Deshmukh demand cancel appointment of University chancellor to Chief Minister Uddhav Thackeray.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं