पुणे: कात्रज गावठाण रस्ता चकाचक; नगरसेवक वसंत मोरेंचा विकास कामांचा धडाका

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी कात्रज गावठाण जुन्या बस स्टॉप समोरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण केल्याने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे वर्दळीच्या मार्गावरील वाहनांना देखील विस्तृत रस्ता उपलब्ध झाला आहे.
कात्रज गावठाण जुन्या बस स्टॉप समोरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले. pic.twitter.com/d1Sq1Ug8lz
— Vasant More (@vasantmore88) January 17, 2020
मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या बाबतीत मनसे नगरसेवक वसंत मोरे सातत्याने नजर ठेवून असतात आणि प्रशासकीय पातळीवर तोडगा काढण्यासाठी नेहमीच अग्रेसर असल्याचं पाहायला मिळालं आहे. नगरसेवक पदाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व विकास कामांच्याबाबतीत त्याचा आलेख नेहमीच चढता राहिलेला आहे. दरम्यान, काल त्यांनी महापौर कार्यालयात पक्ष नेत्यांची बैठक आयोजित केली होती. त्यात लेक टाऊन पुलासंदर्भात काय परिस्थिती आहे याची विचारणा केली होती आणि त्यासंबंधित अधिकाऱ्यांसोबत भेट देऊन पाहणी देखील केली होती आणि विकास कामांचा संपूर्ण आढावा देखील घेतला होता.
काल मा. महापौर कार्यालयात पक्ष नेत्यांची मीटिंग पार पडली. त्यात लेक टाऊन पुलासंदर्भात काय परिस्थिती आहे याची विचारणा केली होती म्हणून आज संबंधित अधिकाऱ्यांसोबत भेट देऊन पाहणी केली. pic.twitter.com/dsfscG4EbO
— Vasant More (@vasantmore88) January 16, 2020
वसंत मोरे यांच्या कल्पकतेने तयार केलेली सावित्रीबाई फुले अभ्यासिका चालू होण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. २६ जानेवारीला या अभ्यासिकेचे स्थानिकांना लोकार्पण होणार असल्याने त्या कामाची देखील त्यांनी पाहणी केली.
मी खूप कष्टाने, अतिशय कल्पकतेने तयार केलेली सावित्रीबाई फुले अभ्यासिका चालू होण्याचा मार्ग आज मोकळा झाला. २६ जानेवारीला या अभ्यासिकेचे लोकार्पण करणार आहोत, त्यादृष्टीने आज पाहणी केली. pic.twitter.com/6vA7RPzrKs
— Vasant More (@vasantmore88) January 15, 2020
मी खूप कष्टाने, अतिशय कल्पकतेने तयार केलेली सावित्रीबाई फुले अभ्यासिका चालू होण्याचा मार्ग आज मोकळा झाला. २६ जानेवारीला या अभ्यासिकेचे लोकार्पण करणार आहोत, त्यादृष्टीने आज पाहणी केली. pic.twitter.com/WpSAwZhdyN
— Vasant More (@vasantmore88) January 15, 2020
Web Title: Pune MNS Corporator Vasant More completed Katraj Gavthan Road redevelopment.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं