जो स्वतः तडीपार होता तो देशातील लोकांची नागरिकता तपासत आहे: अबू आझमी

मुंबई : शिवसेना राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सामील झाल्याने आता शिवसेना केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरामध्ये वाढणार आहे, याची मला खात्री आहे, असं समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी म्हणाले. त्यांनी कालच्या मनसेच्या महाअधिवेशनातील राज ठाकरे यांच्या CAA समर्थनावरून मनसेवर आणि राज ठाकरे यांच्यावर आगपाखड करताना शिवसेनेवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.
राज ठाकरे आता केवळ भारतीय जनता पक्षासोबत जाऊन धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. जो माणूस तडीपार होता, गुजरातच्या जेलमध्ये बंद होता, आज तो देशातील लोकांची नागरिकता तपासत आहे, असं म्हणत अबू आझमींनी अमित शाहांवर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडलं. शिवसेनेविरुद्ध उभे राहून शिवसेनेची जागा घेण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोरदार प्रयत्न करीत आहे असं ते म्हणाले.
राज ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन दिल्याने अबू आझमी मनसेवर प्रचंड संतापल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ‘राज ठाकरे कोण आहेत? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा केवळ एक आमदार आहे. राज ठाकरेंना प्रसार माध्यमांनी एवढा मोठं केल्याचं सांगत त्यांनी माध्यमांवर देखील संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले . राज्य सरकारच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेट वगैरे हे केवळ नाटक असल्याचं सांगताना पुढे ते म्हणाले की, आता राज ठाकरेंचे राजकरणात कोणतेही स्थान नाही”, असं सांगत वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला.
मला बदबू आझमी म्हणणारे राज ठाकरे आमदार त्रस्त आहेत, त्यांचे आमदारच निवडून येत नाहीत. ना आमदार, ना नगरसेवक. थकलेल्या, हरलेल्या राज ठाकरेंना कुणीच जवळ न केल्याने, ते भारतीय जनता पक्षासोबत जात आहेत. शिवसेना तब्बल ३० वर्षापासून कार्यरत आहे आणि त्यांना भारतीय जनता पक्षाने धोका दिला आहे असं ते म्हणाले.
Web Title: Samajwadi MLA Abu Asim Azami criticized Union Home Minister Amit Shah over CAA and NRC.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं