मागच्या काळात सुद्धा फोन टॅपिंगचे प्रकार घडले, ती एक रणनीती असते: मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई : भाजप सत्तेत असताना विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, खा. संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेत्यांचे फोन टॅप करण्याचे व त्यांचे व्हॉट्सअॅप मेसेज वाचणारे तंत्र इस्रायलवरून मागवण्यात आले. त्यासाठी एका आयपीएस अधिकाऱ्यास काही वेळा इस्रायलला पाठवण्यात आले, अशी माहिती आल्याने याची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.
या प्रकरणात एका आयपीएस अधिकाºयाचा सहभाग होता. त्या अधिकाºयास सरकारमधील एका बड्या नेत्याने इस्रायलला पाठवले होते. तेथे जाऊन त्या अधिकाऱ्याने फोन टॅपिंगची व व्हॉट्सअॅप मेसेज वाचण्याची प्रणाली आणली. ती वापरून विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांच्या हालचाली, बोलण्यावर लक्ष ठेवले गेले, अशी माहिती आहे. दरम्यान, यावर ‘आमच्या सरकारने तसे कोणतेही आदेश दिले नव्हते’, असे स्पष्टीकरण देताना इस्रायलला जाऊन चौकशी करायची असेल तर तीही करावी, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिले आहे.
त्यानंतर आपल्याकडे असलेल्या सत्तेचा दुरुपयोग करून लोकशाहीचे, राज्यघटनेचे जास्तीत जास्त नुकसान करण्याचा हा प्रयत्न आहे. अशाने देशात लोकशाही ठेवायची का, घटना शाबूत राहणार का, असे अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीत. फोन टॅपिंगसारख्या प्रकारातून भाजपचे संकुचित धोरण स्पष्ट होते,’ असे सांगून राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरून भाजपवर शुक्रवारी सडकून टीका केली. व्यक्तिस्वातंत्र्य कोणत्याही परिस्थितीत टिकायलाच हवे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, जळगाव येथील एका कार्यक्रमात या विषयावर बोलताना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, मागच्या काळात देखील फोन टॅपिंगचे असे प्रकार घडले आहेत आणि ही एक प्रकारची रणनीती असते. परंतु, कुणाचेही फोन टॅपिंग करणे चुकीचेच आहे. हा प्रकार करण्यामागे कोण आहे, हे लवकरच समोर येईल, अशा शब्दांत मंत्री पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. परंतु, आमचे सरकार खचणार नाही. पाच वर्षे काम करतच राहील, असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.
तसेच ‘कोणाचेही फोन टॅपिंग करणे चुकीचे आहे. या गोष्टीचे कुणीही समर्थन करणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार खचावे, म्हणून भारतीय जनता पक्षाकडून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. फोन टॅपिंग हा त्यातलाच एक भाग आहे,’ अशी टीका राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर केली.
Web Title: Minister Gulabrao Patil talked about Phone tapping issue.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं