कोरेगाव-भीमा: तपासासाठी एनआयएचे पथक पुण्यात; पुणे पोलिसांचं सहकार्य नाही

पुणे: कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA कडे सोपवण्यात आला आहे. NIA ची टीम पुणे पोलीस मुख्यालयात दाखल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी विशेष चौकशी पथकामार्फत (SIT) या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. ज्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. मात्र २५ जानेवारीला हे प्रकरण केंद्रीय गृहमंत्रलायने एनआयएकडे सोपवले.
दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने एल्गार परिषद गुन्ह्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्याचा निर्णय घेतला असला, तरी हा तपास ‘एनआयए’कडे देण्यास राज्य सरकार अनुत्सुक असल्याचे समजते. हा तपास ‘एनआयए’कडे देण्याबाबत राज्य सरकारकडून कायदेशीर सल्ला घेण्यात येत असून त्यानंतरच हा तपास ‘एनआयए’ करणार, की नाही, याचे भवितव्य ठरणार आहे. दरम्यान, ‘एनआयए’च्या अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने सोमवारी पुणे पोलिस आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून या गुन्ह्याची व्याप्ती समजून घेतली आहे.
एनआयएचे पोलीस अधीक्षक विक्रम खलाटे यांच्यासह ८ जणांचे पथक तीन तास आयुक्तालयात होते. त्यांनी एल्गार परिषदेच्या तपासाप्रकरणी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त व शिवाजी पवार यांच्याकडून माहिती घेतली. राज्य सरकारने हा तपास एनआयएकडे सोपविल्याचे वा एनआयएला कागदपत्रे देण्याचे पत्र दिले नसल्याने आम्ही गृहविभागाकडून माहिती घेऊनच कागदपत्रे देऊ , असे पोलिसांनी त्यांना सांगितले.
Web Title: Bhima Koregaon Riot case NIA Team in Pune Police head Quarters.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं