हिंदुत्वात वचन पाळलं जातं, मोडलं जाणाऱ्या हिंदुत्वाला मी स्वीकारत नाही: मुख्यमंत्री

मुंबई: शिवसेनेच्या सामना या मुखपत्राला दिलेल्या विशेष पहिल्या मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते. सामनाचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांना ठाकरे उत्तरे देत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला विशेष मुलाखत दिली असून, त्यामध्ये त्यांनी सरकार स्थापनेच्या घडामोडीपासून वादग्रस्त नागरिकता कायद्यापर्यंत, राहुल गांधींपासून अजित पवारांपर्यंत प्रत्येक प्रश्नावर उत्तरे दिली आहेत.
सत्ता स्थापनेच्या वाटाघाटीत भारतीय जनता पक्षानं वचन पाळलं नसल्याचा दावा करत राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडले. हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेवर टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. “आम्ही हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र आलो आणि हिंदुत्वात वचन पाळणं याला महत्व आहे. वचन जर मोडलं जात असेल तर असं हिंदुत्व मी स्वीकारायला तयार नाही,” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला टोले लगावले.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जुने मित्रपक्ष ते नवे मित्रपक्ष अशा सर्वच प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भाजपाच्या नैतिकतेवर बोलताना, रामविलास पासवान त्यांच्याबद्दल काय बोलले होते? नितीशकुमार काय बोलले होते?, असे प्रश्न विचारतानाच, आता बिहारमध्येच त्यांची आपापसात लागलीय, तरी ते एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. त्यामुळे तुम्ही नैतिकता शिकवू नका असा टोला भारतीय जनता पक्षाला लगावला. भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राला आणि देशाला नैतिकता शिकण्याची गरज नाही, अशा शब्दांत ठाकरे यांनी आपल्यावर नैतिकतेच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला खडेबोल सुनावले.
दरम्यान, देशातील अशा अनेक राजकीय नेत्यांवर ते काही करतील का असा प्रश्न संजय राऊत यांनी मुलाखतीत उपस्थित केला आणि त्यात डॉ. मनमोहन सिंग यांचं नाव पुढे आलं, ज्यांना त्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं मात्र भारतीय अर्थव्यस्थेतील त्यांचं पंतप्रधान म्हणून योगदान मोठं असल्याचं सर्वश्रुत आहे. मात्र यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील अशाच टीकेला सामोरं जावं लागत असल्याच संजय राऊत यांनी विचारताच, मी तुलनेत डॉ. मनमोहन सिंग यांच्या पेक्षा जास्त बोलतो असं उद्धव ठाकरे गमतीने म्हणाले.
Web Title: CM Uddhav Thackeray answer to BJP over Hindutva issue during interview question.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं