फोटोग्राफी तर माझा छंद आहे, तो मी सोडणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा दुसरा भाग आज (मंगळवार) प्रसारित करण्यात आला. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकार टाकला आहे. शेतकरी कर्जमुक्ती, बुलेट ट्रेन, उद्योगधंदे, मराठवाड्यातील पाणीप्रश्न यावर त्यांनी भाष्य केले.
मुख्यमंत्री म्हणाले, ”सरकार एखाद्या प्रतिभावान व्यक्तिला ब्रॅंण्ड एम्बेसिडर नेमते, नंतर अशा लोकांना पुढे काय करायचे, ते काहीच माहिती नसते. तो तात्पुरता खुष होतो. परंतु, ते कशासाठी नेमले, याचा उद्देश पाहणे आवश्यक असते. त्यामुळे मी असे ठरविले आहे, की आता यापुढे अशा नियुक्त्या करण्यापेक्षा आपण स्वतः अशा स्थळांना भेटी द्यायच्या. पर्यटनस्थळे म्हणजे केवळ पर्यटकीय दृष्टीची स्थळे नाही, तर त्यामध्ये काही जंगले असतील. लेण्या असतील. धार्मिकस्थळे, तीर्थस्थळे असतील. तेथे मी स्वतः जाणार आहे. मी एकटाच नाही, तर माझ्यासोबत विविध क्षेत्रातील नामवंतांना बरोबर घेऊन जाणार आहे.”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची धमाका मुलाखत (भाग – 2)@CMOMaharashtra @rautsanjay61 https://t.co/Wksf6khzKD
— Saamana (@Saamanaonline) February 4, 2020
ते पुढे म्हणाले, ”काही पर्यटक, कलाकार, संबधित अधिकारी यांचा ताफा बरोबर असेल. त्यामुळे त्या स्थळांचा टुरिस्ट मॅप तयार होऊन अशा पर्यटनस्थळांचा विकास करणे शक्य होईल. महाराष्ट्रातील अशी स्थळे जागतिक नकाशावर कसे नेता येईल, याचे नियोजन करण्यात येईल. तसेच तेथील चांगले फोटोही काढणार आहे. फोटोग्राफी तर माझा छंद आहे. तो मी सोडणार नाही. तो काही वाईट नाही. मी पर्यटनस्थळांना भेटी देताना कॅमेरा घेऊन जाणार आहे.”
मुंबई हे न झोपणारे शहर आहे. कष्टकऱ्यांसाठी साई उपलब्ध करून देणाऱ्यांसाठी नाईट लाईफचा उपयोग होऊ शकतो. पब, बार यासाठी फक्त नाईट लाईफ नाही, सर्वसामान्यांसाठी हे खूप गरजेचे आहे असं ते सरकारच्या नाईट लाईफच्या निर्णयावर मुलाखतीत म्हणाले.
Web Title: CM Uddhav Thackeray says Photography is my hobby.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं