मनसे हिंदुत्व महामोर्चा इम्पॅक्ट; विरारमध्ये २३ घुसखोर बांगलादेशींना अटक

विरार: मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांविरोधात एल्गार पुकारत मनसेने मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर आता बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींविरोधात पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. विरारच्या अर्नाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या २३ बांगलादेशींविरोधात विरार पोलिसांनी कारवाई केली आहे.
अनैतिक मानवी वाहतूक, पालघर दहशतवाद विरोधी पथक आणि अर्नाळा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अर्नाळा, कळंब, राजोडी परिसरातून २३ बांगलादेशींना अटक केली आहे. सापळा कारवाई दरम्यान मंगळवारी मध्यरात्री या बांगलादेशींना अटक करण्यात आली. यामध्ये १० महिला १२ पुरुष आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या बांगलादेशींविरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेले सर्व बांगलादेशी विरार परिसरात भंगार विकण्याचे आणि मोलमजुरी
मुंबईमध्ये ९ तारखेला मनसेचा महामोर्चा पार पडला त्यात देशातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलून देण्यासाठी शक्तिप्रदर्शन करण्यात आलं तसेच कडवट हिंदुत्वाची तलवार बाहेर काढण्याची तंबी देखील देण्यात आली होती. त्यानंतर याविषयावरून सुस्त असणारं पोलीस प्रशासन जागं झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Web Title: Bangladesh people arrested in Virar who were lived illegally in India.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं