Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-pagenavi domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the schema-and-structured-data-for-wp domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the breadcrumb-navxt domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function register_sidebar was called incorrectly. No id was set in the arguments array for the "Sidebar" sidebar. Defaulting to "sidebar-1". Manually set the id to "sidebar-1" to silence this notice and keep existing sidebar content. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 4.2.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
Paytm कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, कंपनीचा ‘वर्क फ्रॉम होम’चा निर्णय | Paytm कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, कंपनीचा 'वर्क फ्रॉम होम'चा निर्णय | महाराष्ट्रनामा – मराठी
3 May 2025 1:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या Tata Power Share Price | टाटा पॉवर घसरतोय, पण पुढे मजबूत कमाईची संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमधील घसरण थांबेना, आता काय करावं - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK
x

Paytm कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, कंपनीचा 'वर्क फ्रॉम होम'चा निर्णय

Paytm Employee, Corona Virus Positive

नवी दिल्ली: इटलीतून आलेल्या काही पर्यटकांना करोनाची लागण झाल्याचे दिसून आले असतानाच आता कोची येथे इटलीतून आलेल्या एका जहाजावरील ४५९ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. ‘कोस्टा व्हिक्टोरिया’ असे या जहाजाचे नाव असून ते कोची बंदरात आले आहे. मंगळवारी त्यावरील सर्व प्रवाशांची ताप व इतर लक्षणांबाबत तपासणी करण्यात आली आहे. यातील ४५९ प्रवासी उतरले असून त्यातील ३०५ भारतीय आहेत. सर्व प्रवाशांची चाचणी करण्यात आल्याची माहिती कोची पोर्ट ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी जिजो थॉमस यांनी दिली.

दुसरीकडे, जगभरात कहर माजवलेल्या कोरोना विषाणूने भारतामध्येही शिरकाव केलाय. बुधवारी गुडगावमधील लोकप्रिय डिजिटल पेमेंट अ‍ॅप पेटीएम कंपनीचा एक कर्मचारी कोराना बाधित असल्याची पुष्टी झाली. कंपनीने एका परिपत्रकाच्या माध्यमातून कर्मचाऱ्याची कोराना टेस्ट पॉजिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. या प्रकारानंतर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसांची सुट्टी दिली असून त्यांना घरून काम करण्यास परवानगी दिली आहे.

कंपनीनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कर्मचारी हा नुकताच इटलीहून सुट्टीचा आनंद घेऊन परतला होता. कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर इतर कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती पेटीएम कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली. ते म्हणाले की, संबंधित व्यक्तीच्या टीममधील सहकाऱ्यांना कोरोना चाचणी करण्याबाबत सांगण्यात आले आहे. या घटनेचा कामावर कोणताही प्रभाव पडणार नसुन काम सुरुच राहिल, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

रशिया, जर्मनी, सौदी अरेबिया, फ्रान्स, इंडोनेशिया, ब्रिटन युरोपियन युनियन अशा किमान 60 देशांत कोरोना फैलावला आहे. त्यामुळे या सर्व देशांत अनेक निर्बंध घालण्यात आले असून, तेथील जवळपास सर्व सार्वजनिक समारंभ, क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अनेक देशांत शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

 

News English Summery: India has also been infected with the corona virus that has spread worldwide. An employee of Paytm Company, a popular digital payment app in Gurgaon, was confirmed dead on Wednesday. The company has revealed through a circular that the employee has come to the test positive. The company has given its employees two days’ leave and allowed them to work from home. According to the company, the concerned employee had just returned from Italy enjoying a holiday. Other employees were advised to work from home after confirming that the employee had coronary infection, a spokesperson for the Paytm company said. He said colleagues from the concerned person’s team had been asked to conduct a corona test. The incident will not have any impact on the work, but the work will continue, he said.

 

Web News Title: Story Paytm employee in Gurgaon has tested positive for Corona Virus says in company official statement.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

x