अण्णांचा जन-लोकपालसाठी मोदीसरकार विरोधात एल्गार, दिल्लीला रवाना

राळेगण सिद्धी : जन-लोकपाल आंदोलनासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज दिल्लीला रवाना झाले. लवकरच ते मोदी सरकारवर विरोधात लोकपाल विधेयक पारित करावे म्हणून उपोषणाला बसणार आहेत.
दिल्लीला कूच करण्यापूर्वी अण्णांनी यादवबाबांचे दर्शन घेऊन नतमस्तक झाले. त्यावेळी राळेगणसिद्धी गावातील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या त्यांनी अण्णांचं औक्षण केले. आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अण्णा दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाले. गावातील सर्वच लोक अण्णांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अण्णा २३ मार्च पासून रामलीला मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. मुख्य म्हणजे लोकपाल विधेयका बरोबर अण्णांनी शेतकऱ्यांचा मुद्दा ही मुख्य अजेंड्यावर ठेवला आहे.
लोकपाल विधेयकात देशाचं पंतप्रधान पद सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात येणार आहे त्यामुळे हे विधेयक मोदीसरकार स्वीकारणार की नाही हे पाहावं लागेल. सुरुवातीला म्हणजे २०१४ च्या निवडणुकांपूर्वी भाजपने या विधेयकाला पाठिंबा दर्शविला होता. परंतु सत्तेत येताच त्यांनी लोकपाल विधेयकावर युटर्न घेतला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं