देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये

नवी दिल्ली, २८ एप्रिल: लॉकडाउनमुळे करोनाच्या प्रसारावर काही प्रमाणात परिणाम झाला असल्याचं वेगवेगळ्या अहवालातून समोर आलं आहे. मात्र, आता देशासमोर करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची चिंता उभी ठाकली आहे. गेल्या २४ तासात देशात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. देशभरात ६० जणांचा मृत्यू झाला असून, देशभरातील रुग्णांची संख्या २९ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
तर, महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ५२२ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, गुजरातमध्ये २४७ नवे रुग्ण आढळले आहेत. या मुळे सर्वाधिक रुग्णांची वाढ होणाऱ्या देशातील शहरांवर आता सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये १९६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून तेथे एकूण रुग्णांची संख्या १,३७२ वर पोहोचली आहे.
देशातील सर्वात मोठे औद्योगिक राज्य असलेल्या गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११ हजार ३६९ वर पोहचली आहे. यामध्ये एकट्या महाराष्ट्रात कोरोनाचे ८ हजार ०६८ रुग्ण आहेत. तर गुजरातमध्ये ३ हजार ३०१ रुग्ण आहेत. गुजरातमध्ये कोरोनाचे पहिले प्रकरण १९ मार्च रोजी समोर आले होते. तर केरळमध्ये देशातील कोरोनाचे पहिले प्रकरण ३० जानेवारीला समोर आले होते. त्यानंतर, लॉकडाऊनच्या ४० दिवसांत कोरोनाची प्रकरणं ९९ टक्क्यांनी वाढली.
News English Summary: In Gujarat and Maharashtra, the largest industrial states in the country, the number of coronary heart disease patients has reached 11,369. In Maharashtra alone, there are 8,068 patients with corona. There are 3 thousand 301 patients in Gujarat.
News English Title: Story Corona virus 41 percent of total patients of Covid 19 is only in Maharashtra and Gujarat states News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं