राष्ट्रीय महामार्गावर 'राष्ट्रीय नागरिकांचा' खिसा रिकामा

मुंबई : राष्ट्रीय महामार्गावरील नवीन आर्थिक वर्षापासूनचा प्रवास महागणार आहे. कारण मोदीसरकारने राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल शुल्कात आता 6 टक्के इतकी वाढ केली आहे. तर वांद्रे – वरळी सी लिंकच्या टोलमध्ये थेट दहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
नवीन आर्थिक वर्षापासून आधीच पेट्रोल – डिझेलचे दर वाढले असताना राष्ट्रीय महामार्गावरील नवीन आर्थिक वर्षापासूनचा प्रवास महागणार आहे. कारण मोदीसरकारने राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल शुल्कात आता 6 टक्के इतकी वाढ केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर ‘राष्ट्रीय नागरिकांचा’ खिसा रिकामा होणार आहे.
मोदीसरकारने राष्ट्रीय महामार्गावरील टोलदरात दरवर्षी पाच ते सहा टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. त्याप्रमाणेच प्रत्येक रस्त्याच्या अंतरानुसार टोलची वाढ ठरवण्यात येते. मोदीसरकारच्या या निर्णयामुळे मुंबई-नाशिक, मुंबई-बेंगळुरू, मुंबई-आग्रा आणि मुंबई अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गांने प्रवास करताना प्रवाशांना सध्याच्या टोल रकमेच्या तुलनेत सहा टक्के रक्कम जास्त द्यावी लागू शकते.
मुळात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे टोलबंदीची घोषणा याच सरकारने सत्तेत येण्यापूर्वी केली होती. परंतु प्रत्यक्ष सत्तेत आल्यावर मोदीसरकारने टोल वाढीचा निर्णय घेतला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं