भारतातला कोरोना व्हायरस शक्तिशाली झाल्याने तरुणांच्या मृत्यूत वाढ - द वॉशिंग्टन पोस्ट

वॉशिंग्टन, २५ मे: जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणुचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात ६ हजार ९७७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, १५४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोना रुग्ण संख्या वाढीतील हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. यामुळे देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ३८ हजार ८४५ वर पोहचली आहे.
देशभरातील तब्बल १ लाख ३८ हजार ८४५ करोनाबाधितांमध्ये सध्या उपचार सुरू असलेले ७७ हजार १०३ जण, उपाचारानंतर रुग्णालायतून सुट्टी देण्यात आलेले ५७ हजार ७२० व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या ४ हजार ०२१ जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर द वॉशिंग्टन पोस्ट मध्ये आलेल्या एका रिपोर्टने सगळ्यांची चिंता वाढवली आहे. भारतातला कोरोना व्हायरस अधिक शक्तिशाली झाला असून तो युवकांना मोठ्या संख्येने टार्गेट करत असल्याचं त्यात म्हटलं आहे. जगातल्या ज्या देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला त्या देशातल्या आकडेवारीवरून तिथे ज्येष्ठ नागरिकांचा जास्त प्रमाणात बळी गेला आहे. मात्र विकसित आणि तरुण देश समजल्या जाणाऱ्या भारत आणि ब्राझिलमध्ये हा व्हायरस तरुणांचा जास्त बळी घेत असल्याचं स्पष्ट होत आहे.
In the developing world, the coronavirus is killing far more young people https://t.co/E05rcEtmA8
— The Washington Post (@washingtonpost) May 24, 2020
या अहवालानुसार ब्राझिलमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये ५० पेक्षा कमी वयाचे ५ टक्के लोकं आहेत. स्पेन आणि इटलीच्या तुलनेत हे प्रमाण दहा टक्के जास्त आहे. तर भारतात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये ६० टक्के लोक हे ५० पेक्षा कमी वयाचे आहेत असंही त्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
News English Summary: A report in The Washington Post has raised concerns. The corona virus has become more powerful in India, targeting a large number of young people, it said. In India, 1.38 lakh people have been infected so far and 4,021 people have been killed by corona.
News English Title: Corona becomes more dangerous in India now youth is being targeted News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं