यंदाचा पालखी सोहळा पायी होणार नाही, पण इतर ३ पर्याय दिले

मुंबई, २९ मे: कोरोना व्हायरसच्या संकटामुळे इतिहासात पहिल्यांदाच देहू आणि आळंदीचा पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. आषाढी वारी बद्दल निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये पुण्याच्या काऊन्सिल हॉलमध्ये बैठक झाली. या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहे. या पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने न्यायच्या याबाबतचा निर्णय नंतर होणार आहे. पण देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनामध्ये बैठकीत एकमत झालं.
यंदाच्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा पादुका घेऊन कमी लोकांमध्ये वाहन, हेलिकॉप्टर किंवा विमान या तीन पर्यांया पैकी एकाद्वारे त्यावेळीच परिस्थिती पाहून, पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आळंदी देवस्थान प्रमुख विकास ढगे आणि देहू देवस्थान प्रमुख अभय टिळक यांनी दिली.
त्यामुळे यंदा पायी वारी होणार नाही, हे निश्चित झालं असून यावर सर्वांचं एकमत झालं आहे. शासनाने देखील त्याबाबतचा निर्णय़ केलेला आहे. फक्त पादुका जात असताना त्या बस, विमान किंवा हेलिकॉप्टर असे तीन पर्याय शासानाने ठेवलेले आहेत.
News English Summary: For the first time in history, the Dehu and Alandi foot palanquin ceremonies have been canceled due to the corona virus outbreak. Deputy Chief Minister Ajit Pawar and Warkaris’ representatives met at the Council Hall in Pune to take a decision on Ashadi Wari. This historic decision was taken at this meeting.
News English Title: Corona Virus Dehu Alandi Palakhi cancelled by Maharashtra Government News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं