पुलावामा चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण, २ दहशवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर, २३ जून: एकीकडे भारत-चीन सैन्यात तणावाचे वातावरण असताना दुसरीकडे दहशतवादी कुरापत्याही सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागात आज सकाळी झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. तर दशहतवाद्यांविरोधात लढत असताना महाराष्ट्राच्या सुपूत्राला वीरमरण आले. सीआरपीएफ जवान सुनील काळे हे या चकमकीत शहीद झाले. ते सोलापूर जिल्ह्यातील पानगावचे रहिवासी होते.
आज(दि.२३) पहाटे लष्कर, सीआरपीएफ आणि स्थानिक पोलीस यांच्या संयुक्त मोहिमेत पुलवामा भागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असताना या दरम्यान, तेथील बंडजू येथे दहशतवाद्यांशी चकमक उडाली. यात सीआरपीएफ जवान सुनील काळे यांना वीरमरण आले. काळे हे सोलापूर जिल्ह्यातील पानगाव (ता. बार्शी) येथील मूळ राहणारे होते. ते शहीद झाल्याची माहिती मिळताच पानगाव व आसपासच्या अनेक गावांमध्ये स्वयंस्फुर्तीने ‘बंद’ पाळून शहीद काळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
News English Summary: Indian security forces killed two militants in a clash in Pulwama area of Jammu and Kashmir this morning. While fighting against the militants, Suputra of Maharashtra died a heroic death. CRPF jawan Sunil Kale was killed in the encounter.
News English Title: Indian security forces killed two militants in a clash in Pulwama area of Jammu and Kashmir News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं