आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या घरावर ईडीचा छापा

नवी दिल्ली, २७ जून: संदेसरा समूहाच्या ५००० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची चौकशी करण्यासाठी शनिवारी सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) पथक अचानक त्यांच्या घरी धडकले. प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी ‘ईडी’च्या तीन अधिकाऱ्यांचे पथक अहमद पटेल यांच्या दिल्लीतील मदर तेरेसा क्रिसेंट निवासस्थानी दाखल झाले. सध्या ‘ईडी’च्या पथकाकडून त्यांचा जबाब नोंदवून घेतला जात आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दावा केला आहे की, संदेसरा बंधूंनी केलेला घोटाळा हा पीएनबी घोटाळ्यापेक्षा मोठा आहे. स्टरलिंग बायोटेक लिमिटेड/संदेसरा ग्रुप आणि संचालक नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दीप्ती संदेसरा यांनी भारतीय बँकांना 14 हजार 500 कोटी रुपयांहून जास्त रकमेला गंडवले आहे. स्टरलिंग बायोटेकचे मालक संदेसरा बंधू चेतन जयंतीलाल संदेसरा आणि नितीन जयंतीलाल संदेसरा यांच्यावर बनावट कंपन्या तयार करून बँकांकडून कर्ज घेतल्याचा आरोप आहे. संदेसरा बंधूंविरुद्ध सीबीआयने 5700 कोटी रुपयांच्या फसवणुकीचे प्रकरण नोंदवले होते.
काय आहे प्रकरण?
स्टरलिंग बायोटेक/संदेसरा समुहावर बँकेच्या फसवणुकीचा आणि मनी लॉन्ड्रिंगचा आरोप असून गुन्हा दाखल करण्यात आहे. आता हाच धागा अहमद पटेल यांच्यापर्यंत पोहोचला आहे. पूर्वीपासूनच स्टर्लिंग प्रकरणात अहमद पटेल आणि त्यांच्या जावयावरही प्रश्न उपस्थित केले जात होते. सांदेसरा बांधव अहमदनगर पटेल यांचा जावई इरफान सिद्दीकी यांना मोठ्या प्रमाणात लाच देतात असा आरोप झाला होता.
स्टर्लिंगच्या एका संचालकांनी चौकशीत सांगितले होते, “चेतन संदेसरा आणि गगन धवन अनेक वेळा पटेल यांच्या जावयाच्या घरी पैशांनी भरलेल्या बॅग घेऊन जात असत. चार-पाच वेळा मी स्वत: त्यांच्याबरोबर होतो. एकावेळी 15-25 लाख रुपये देण्यात येत. चेतन संदेसरा अनेकदा अहमद पटेल यांच्या अधिकृत निवासस्थानी (23 मदर क्रेसेंट, नवी दिल्ली) भेट देत असत. सांदेसरा बांधव कोड वर्डमध्ये त्याला मुख्यालय 2′ असे म्हणत. इरफान सिद्दीकी यांना संदेसरा बंधू जे 23 आणि फैजल पटेल जे 1 म्हणून संबोधत.
News English Summary: A team of the Directorate of Recovery (ED) on Saturday raided the house of senior Congress leader Ahmed Patel in connection with the Rs 5,000 crore financial misappropriation of the Sandesara group.
News English Title: Enforcement directorate ED is interrogating Senior Congress leader Ahmed Patel at his residence in Delhi News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं